Diwali 2020 Diya Making Ideas: दिवाळीसाठी प्लॅस्टिकचे चमचे, सीडीज, प्लॅस्टिक बाटली पासून बनवा आकर्षक दिवे आकर्षक दिवे, Watch Videos

यात तुम्ही जुन्या सीडी, प्लॅस्टिकचे चमचे, बाटल्या, ग्लास यांचा वापर करुन आकर्षक दिवे बनवू शकता.

Diwali 2020 Diya Making Ideas (Photo Credits: YouTube)

Diwali 2020 DIY Making: दिवाळीत (Diwali 2020) बच्चे कंपनीपासून ते मोठ्या पर्यंत सर्वजण घर सजावटीत (Diwali Decoration) व्यस्त होतात. घरासाठी आकाश कंदिल बनवणे, दिवे बनवणे, घर छान सजवणे या सर्व गोष्टीत आर्वजून सहभागी होतात. दिवाळी म्हणजे दिव्यांची (Diya) रोषणाई. हे सुंदर दिवे, पणत्या सजवून त्यांना घरात लावल्याने आपले घर झळाळून निघते आणि घरातील अंध:कार, अनिष्ट गोष्टी दूर होतात असे म्हणतात. मग असे हे दिवे काही हटके अंदाजात बनवले तर? यंदा या सजावटीसाठी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करुन घरगुती गोष्टींनीच तुम्ही छान आकर्षक दिवे बनवू शकता.

घरातील टाकाऊ गोष्टींपासून तुम्ही आकर्षक दिवे बनवू शकता. यात तुम्ही जुन्या सीडी, प्लॅस्टिकचे चमचे, बाटल्या, ग्लास यांचा वापर करुन आकर्षक दिवे बनवू शकता.

पाहा घरगुती गोष्टींपासून बनवलेले मनमोहक दिवे

सीडीपासून बनवलेला दिव्यांचा स्टँड

प्लॅस्टिक बाटलीपासून बनवलेले दिवे

हेदेखील वाचा- Diwali 2020 Kandil Making At Home : घरच्या घरी सोप्या पद्धतीने असा बनवा आकाश कंदील ( Watch Video )

पाण्याचे दिवे

प्लॅस्टिक चमच्यापासून बनवलेले दिवे

मातीच्या पणत्यावर नक्षीकाम

अशा पद्धतीने दिवे बनवून तुम्ही यंदा इको फ्रेंडली दिवाळी साजरी करू शकता. तुमची ही कलाकृती पाहून तुमचे घरचेही खुश होतील. तर मोठ्या माणसांनी अशा पद्धतीचे दिवे बनवल्यास त्यांच्या पुढील पिढीसमोर पर्यावरणाचा छान सामाजिक संदेश देता येईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif