Diwali 2018 : सोशल मीडियावर दिवाळी बोनस 2018 मीम्स व्हायरल
पगार पाहून तुम्ही खूश असाल की नाही माहित नाही पण हे Diwali Bonus 2018 मीम्स नक्कीच तुमच्या चेहर्यावर एक हास्याची लकेर आणतील.
दिवाळी म्हणजे रोषणाईचा, चैतन्याचा,आनंदाचा सण आहे. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. अगदी सोन्या चांदीपासून ते गाडी, घर विकत घेतली जातात. त्यामुळेच सरकारी कर्मचार्यांपासून तेअगदी कॉरपोरेट क्षेत्रात काम करणार्या प्रत्येक व्यक्तीला दिवाळीचा बोनस कसा आणि किती मिळतोय ? याबाबत दरवर्षी कुतुहल असतं. प्रत्येक वर्षी कामगारांच्या अपेक्षा पूर्ण होतातच असे नाही. मग कळत नकळत दिवाळी बोनस या विषयावर जोक्स होतात. नक्की वाचा : दिवाळी बोनस म्हणून गाड्या, एफडी, दागिने आणि घरांची खैरात
यंदाही झपाट्याने वाढत असलेल्या सोशल मीडियावर दिवाळी बोनसवरून मीम्स व्हायरल होण्यास सुरूवात झाली आहे. काहींचा पगार क्रेडीट झाला असेल, काहींचा बोनससह आला असेल तर काहींचा अजूनही यायचा असेल... पगार पाहून तुम्ही खूश असाल की नाही माहित नाही पण हे मीम्स नक्कीच तुमच्या चेहर्यावर एक हास्याची लकेर आणतील. Diwali Special : दिवाळी बोनस देण्याची प्रथा अशी झाली सुरू...
दिवाळी बोनस 2018 मिम्स
दिवाळी हा आनंदाचा सण आहे. तुमचा पगार, इतरांचा पगार, तुमचा बोनस, मित्रांचा बोनस यावरून हिरमसून जाऊ नका. हा आनंदाचा सण आहे त्यामुळे तुमच्याकडेजे काही आहे... जितकं काही आहे त्या क्षणांमधून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. ही दिवाळी तुम्हांला आनंदाची, चैतन्याची, सुखा, समाधानाची जावो हीच सदिच्छा !!!