Dhanteras 2020 Wishes in Hindi: धनत्रयोदशीनिमित्त हिंदी भाषेतून आपल्या प्रियजनांना पाठवा शुभेच्छा संदेश
धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्यास उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते, तर आजच्या अशा या खास दिवसाच्या हिंदी शुभेच्छा संदेश आपल्या प्रियजनांना पाठवून आपला आजचा धनतेरसचा दिवस साजरा करू शकतात.
Dhanteras 2020 Wishes in Hindi: भगवान धन्वंतरीचा (Lord Dhanvantari) जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीच्या (Dhanatrayodashi) दिवशी समुद्र मंथन दरम्यान झाला होता, म्हणून धनतेरसाच्या (Dhanteras) दिवशी धनवंतरी जयंती साजरी (Dhanvantari Jayanti) केली जाते. भगवान धन्वंतरि यांना विष्णू आणि आयुर्वेदांचे जनक मानले जाते. त्यांना देवांचे वैद्य किंवा आरोग्याचा देव असेही म्हणतात. भगवान धन्वंतरीला चार हात आहेत, ज्यामध्ये शंख, चक्र, औषधी आणि अमृत कलश आहेत. धनाची पूजा करण्यासाठी हा दिवस खास मानला जातो. या दिवशी व्यापारी लोक आपल्या दुकानांमध्ये लक्ष्मीची पूजा करतात, तर नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्यांची याच दिवशी आणून पूजन करून वापरात आणल्या जातात. धनत्रयोदशीयाला नवीन वस्तू खरेदी करण्याचीही प्रथा आहे. आजच्या दिवशी सोने, चांदी, नाणी किंवा धातूची वस्तू खरेदी केली जाते. (Yam Deep Daan 2020 Muhurat: धनतेरसच्या संध्याकाळी यमदीप दान का केले जाते? जाणून घ्या यंदाचा शुभ मुहूर्त)
धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्यास उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते, तर आजच्या अशा या खास दिवसाच्या हिंदी शुभेच्छा संदेश आपल्या प्रियजनांना पाठवून आपला आजचा धनतेरसचा दिवस साजरा करू शकतात.
विशेष म्हणजे, धनवंतरी जयंती दिवशी श्रीमंती आणि संपन्नतेची देवी लक्ष्मी देवी, संपत्तीचे देवता कुबेरचा आणि भगवान गणपतीसमवेत धन्वंतरीची पूजा केली जाते. धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक मानले जातात, म्हणूनच राष्ट्रीय आयुर्वेद दिन हा दिवसही भारतात साजरा केला जातो. धनतेरस आणि धन्वंतरी जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.