Devshayani Ekadashi 2019: आषाढी ते कार्तिक एकादशी दरम्यान पाळल्या जाणार्‍या चातुर्मास काळाचं महत्त्व काय?

चातुर्मासाचा काळ हा हिंदू धर्मीयांप्रमाणेच जैन आणि बुद्ध धर्मातील लोकं देखील पाळतात.

Lord Vishnu (Photo credits: Facebook)

Ashadhi Ekadashi 2019: चातुर्मास (Chaturmas) या शब्दामध्येच याचा अर्थ दडला आहे. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी हा चार महिन्याचा काळ चातुर्मास महिन्याचा काळ आहे. हा काळ धार्मिकदृष्ट्यादेखील महत्त्वाचा आहे. देवाच्या भक्तीसाठी हा काळ महत्त्वाचा मानला जातो. यंदा चातुर्मास आषाढ शुद्ध एकादशी (Ashadhi Ekadashi) म्हणजे 12 जुलै 2019 पासून कार्तिक एकादशी (Kartiki Ekadashi) म्हणजे 9 नोव्हेंबर पर्यंतचा काळ आहे. आषाढी एकादशी देव शयनी (Devshayni) आणि कार्तिक एकादशी देव उठनी (Devuthani) एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. त्यामुळे या चार महिन्यांच्या काळात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे काही नियम दिले आहेत. आषाढी एकादशी दिवशी व्रत करणार आहात? 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा

चातुर्मासाच्या काळात भगावान विष्णू झोपी जातात अशी आराधना आहे. त्यामुळे या काळात विष्णूची भक्ती केली जाते. चातुर्मासाचा काळ हा हिंदू धर्मीयांप्रमाणेच जैन आणि बुद्ध धर्मातील लोकं देखील पाळतात. प्रामुख्याने लग्न आणि कोणतीही महत्त्वाची कामं केली जात नाहीत. Ashadhi Ekadashi 2019 Fasting Recipes: यंदाच्या आषाढी एकादशीच्या उपवासाला हे '5' हटके पदार्थ नक्की ट्राय करा; पहा रेसिपीज

धार्मिक महत्त्वाप्रमाणेच आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ महत्त्वाचा असतो. या दिवसात पावसाळा असल्याने वातावरण दमट असतं. हवामानातील बदल आरोग्यावर परिणाम करतात त्यामुळे या काळात उपास, व्रत ठेवले जातात. आहारात मांसाहार, कांदा, लसूण युक्त पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. तसेच वांग्यासारखे वातुड पदार्थ टाळले जातात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif