Dev Deepavali 2023 Wishes In Marathi: देव दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्र, HD Images, WhatsApp Status!

देव दीपावली निमित्त मल्हारी मार्तंड खंडोबारायाच्या देवळात दीपोत्सव साजरा केला जातो.

देव दीपावली । File Images

कार्तिकी पौर्णिमेला देव दिवाळी साजरी झाल्यानंतर महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवसही देव दीपावली (Dev Deepavali) म्हणून साजरा केला जातो. यंदा 13 डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू होत असल्याने देव दीपावली देखील याच दिवशी साजरी केली जाणार आहे. देवदीपावली हा खंडोबाच्या (Khandoba) देवस्थानांमध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे. या मंगल पर्वाच्या पहिल्या दिवसाची आनंदी वातावरणामध्ये सुरूवात करताना तुमच्या प्रियजणांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना देव दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी लेटेस्टली मराठी कडून तयार करण्यात आलेली ही मराठमोळी शुभेच्छापत्र, Wishes, Greetings, HD Images, Wallpapers, WhatsApp Status, Facebook Messages तुम्ही सोशल मीडीयात शेअर करून या आजच्या दिवसाचा आणि नव्या महिन्याची सुरूवात आनंदी वातावरणामध्ये करू शकता.

देव दीपावली निमित्त मल्हारी मार्तंड खंडोबारायाच्या देवळात दीपोत्सव साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत (चंपाषष्ठी) सहा दिवसांची नवरात्र देखील साजरी करण्याची रीत आहे. प्रत्येक कुटुंबाच्या रीतीभातींप्रमाणे देव दीपावली साजरी करण्याची पद्धत देखील वेगवेगळी आहे.  Margashirsha Mahalaxmi Guruvar Vrat 2023 Dates: 13 डिसेंबर ते 11 जानेवारी मार्गशीर्ष महिना; पहा महालक्ष्मी व्रत कोणते 4 दिवस! 

देव दीपावलीच्या शुभेच्छा

देव दीपावली । File Images

देव दीपावली । File Images
देव दीपावली । File Images
देव दीपावली । File Images
देव दीपावली । File Images

उत्तर भारतामध्ये कार्तिकी पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस देव दिवाळी म्हणून साजारा केला जातो. पुराण कथेनुसार भगवान शंकराने जेव्हा त्रिपुरासुराचा वध केला तेव्हा देवांनी याच दिवशी दीपावली साजरी केली. त्यानंतर मागील काही वर्षांपासून काशीमधल्या विविध घाटांवर लाखो दिव्यांनी झगमगाट करण्याची रीत आहे. दशाश्वमेघ घाटावरती गंगेची भव्य आरती करण्याची देखील प्रथा आहे.