Datta Jayanti Date 2023: दत्त जयंती यंदा 26 डिसेंबरला; जाणून मार्गशीर्ष पौर्णिमेची वेळ,पूजा विधी!

महाराष्ट्रात प्रामुख्याने माहुर, औंदुबर, गाणगापूर, नृसिंहवाडी, कुरवपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहाने दत्त जयंतीचा सण साजरा केला जातो.

Happy Datta Jayanati 2022 | File Image

मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेचा दिवस हा दत्त जयंती (Datta Jayanti) म्हणून साजरा केला जातो. यंदा दत्त जयंती 26 डिसेंबर 2023 दिवशी आहे. भगवान दतात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. अत्री ऋषी व माता अनसूया यांच्या पोटी दत्तांचा जन्म झाला. दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्र रूप म्हणून पुजले जाते. त्यांना हिंदू धर्मातील पहिले गुरू म्हणून पाहिले जाते. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही त्यांची विविध मंदिरं असून नित्यनियमाने तेथे पूजा अर्चना केली जाते. महाभारताच्या अनुशासन पर्वात देखील दत्त जन्माचा उल्लेख सापडतो. मग यंदा दत्त जयंती नेमकी कधी? पौर्णिमाचा काळ किती वेळ आहे हे सारं जाणून घेत दत्त जयंती उत्साहात साजरी करा.

दत्त जयंती 2023 वेळ आणि तारीख

दत्त जयंती ही 26 डिसेंबर 2023 दिवशी यंदा साजरी केली जाईल. या दिवशी पहाटे 5 वाजून 46 मिनिटांनी पौर्णिमेला प्रारंभ होत आहे तर समाप्ती 27 डिसेंबरला सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी होणार आहे. हा मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस दत्त जयंती असेल.

दत्त जयंती निमित्त अनेक मंदिरामध्ये दत्त जन्म साजरा करत भंडार्‍याचेही आयोजन केले जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने माहुर, औंदुबर, गाणगापूर, नृसिंहवाडी, कुरवपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नक्की वाचा: December Vrat-Festival 2023: विवाह पंचमी, मोक्षदा एकादशी, ख्रिसमससह डिसेंबर महिन्यात साजरे होणार 'हे' प्रमुख उपवास, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस .

दत्त जयंती कशी साजरी केली जाते?

दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून दत्त मंदिरातमध्ये जाऊन दर्शन घेण्याची प्रथा आहे. तसेच दत्त जयंती दिवशी अनेक भाविक गुरुचरित्र हा दत्त गुरूंच्या कार्यावर बेतलेल्या खास ग्रंथाचं वाचन करतात. मंत्रोच्चारदेखील केले जातात. श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार, 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा अवतार तर 'स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची 'नेमिनाथ' म्हणून तर मुसलमान 'फकिर' म्हणून पूजा करतात.

टीप- सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला असून यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.