IPL Auction 2025 Live

Datta Jayanti 2023 Images: दत्त जयंतीच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी Greetings, Messages, Photos!

दत्त जयंती हा दिवस भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या दत्तात्रयांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो.

Datta Jayanti | File Image

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती (Datta Jayanti) साजरी केली जाते. यंदा ही दत्त जयंती 26 डिसेंबरला आहे. भाविकांसाठी हा दत्त जयंतीचा दिवस महत्त्वाचा आणि मंगलमय दिवस असतो. मग या दिवशी तुमच्या आप्तांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना खास शुभेच्छा देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका. त्यासाठी सोशल मीडीयात तुम्ही WhatsApp Messages, Status, Wishes, Images, Photos शेअर करून या दिवसाची सुरूवात मंगलमय स्वरूपात करायला विसरू नका.

दत्त जयंती हा दिवस भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या दत्तात्रयांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांच्या शक्ती भगवान दत्तात्रेयांमध्ये सामावल्या आहेत, असे म्हणतात. त्याला सहा हात आणि तीन चेहरे आहेत. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. असे मानले जाते की, दत्तात्रेय भक्तांचे स्मरण करून त्यांना मदत करण्यासाठी उपस्थित असतात. भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना केल्या जातात. Datta Jayanti 2023 Wishes In Marathi: दत्त जयंतीच्या शुभेच्छा मराठमोळ्या WhatsApp Messages, Images द्वारा देत साजरा करा दत्तात्रयांचा जन्मदिवस .

दत्त जयंतीच्या शुभेच्छा

Datta Jayanti | File Image
Datta Jayanti | File Image
Datta Jayanti | File Image
Datta Jayanti | File Image

दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते. दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात.