Datta Jayanti 2022 Images: दत्त जयंती निमित्त Greetings, Facebook Messages शेअर करत साजरा करा आजचा मंगलमय दिवस
मार्गशीर्ष पौर्णिमेला त्यांचा जन्म झाला होता त्यामुळे आज साजर्या दत्त जयंतीच्या तुम्ही आप्तांना शुभेच्छा देऊ शकता.
भगवान दत्तात्रय (Bhagwan Dattatreya) यांचा जन्मदिवस दत्त जयंती (Datta Jayanti) म्हणून साजरा केला जातो. भगवान विष्णूंचा एक अवतार असलेल्या दत्तात्रेय यांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी झाला अशी अख्यायिका आहे. त्यामुळे यंदा 7 डिसेंबर दिवशी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या आप्तांना, प्रियजणांना आज तुम्ही सोशल मीडीयामध्ये WhatsApp Status, Messages, Greetings, Quotes, HD Images यांच्या माध्यमातून नक्की देऊ शकता. दरम्यान दत्त जयंती दिवशी अनेक भक्त 'गुरू चरित्रा'चे पारायण करतात. नजिकच्या दत्त मंदिरांना भेट देतात. नक्की वाचा: Datta Jayanti 2022 Wishes In Marathi: दत्त जयंतीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messages, Images द्वारा शेअर करत द्विगुणित करा आजच्या दिवसाचा आनंद.
पुराणांमध्ये दत्ताच्या जन्माविषयी एक कथा सांगितली आहे. त्यानुसार दत्तात्रेय हे अत्री ऋषी आणि अनुसया यांचा पुत्र होते. दत्तात्रयाला सृष्टीचे रचनाकार ब्रम्हदेव, पालनकर्ते विष्णू आणि लय करणारे भगवान शंकर यांच्या रूपात महेश यांचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे दत्तात्रेयाची उपासना ही उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन शक्तीची उपसना असं मानलं जातं. नक्की वाचा: महाराष्ट्रातील प्रसिद्ध दत्तक्षेत्र गाणगापूर, नरसोबाची वाडी, माहूरगड कशी आणि कुठे आहेत?
दत्त जयंतीच्या शुभेच्छा
महाराष्ट्रात माहुर, औंदुबर, गाणगापूर, नृसिंहवाडी, कुरवपूर ही महत्त्वाची दत्त क्षेत्रं आहेत. या ठिकाणी मोठ्या स्वरूपात दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. यंदा कोरोना संकट दूर झाल्याने पुन्हा भाविकांच्या गर्दीने दत्त जयंती दिवशी सारी मंदिरं गजबजणार आहेत.