Christmas Last-Minute Decor Ideas: ख्रिसमस निमित्त अखेरच्या क्षणाला नक्की काय सजावट करायची कळत नसल्यास 'या' ट्रिक्स जरुर पहा (Video)
ख्रिश्चन धर्मातील लोक हा सण मोठ्या आनंदात-उत्साहात साजरा करताना दिसून येतात. या धर्मातील नागरिकांव्यतिरिक्त अन्य नागरिक सुद्धा यामध्ये सहभागी होत त्या सणाचा आनंद लुटताना दिसतात.
Christmas Last-Minute Decor Ideas: प्रत्येक वर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमसचा सण धूमधडाक्यात साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मातील लोक हा सण मोठ्या आनंदात-उत्साहात साजरा करताना दिसून येतात. या धर्मातील नागरिकांव्यतिरिक्त अन्य नागरिक सुद्धा यामध्ये सहभागी होत त्या सणाचा आनंद लुटताना दिसतात. या दिवशी ख्रिसमस ट्री सह संपूर्ण घराला विद्युत आणि मेणबत्तीचा वापर करुन रोषणाई केली जाते. घरात केक, कुकीज तयार करण्यासह पार्टीचे आयोजन ही केले जाते. ख्रिसमसचा सण हा जीजस क्राइस्ट म्हणजेच प्रभू येशूचा जन्मदिवस. परंतु बायबलमध्ये येशूच्या जन्म तारखेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तरीही त्यांचा जन्म दिवस ख्रिसमसच्या रुपात साजरा केला जातो.(Easy DIY Christmas Tree Ideas: साधा कागद ते ग्लिटर पेपर यांचा वापर करत आकर्षक, सोपे ख्रिस्मस ट्री कसे बनवाल?)
गेल्या वर्षी प्रमाणे यंदाची ख्रिसमच्या सण धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. पण जर तुम्ही अद्याप ख्रिसमससाठी सजावट कशी करायची किंवा कोणतीच तयारी केली नसेल तर पुढील काही सोप्प्या ट्रिक्स तुमच्या नक्की कामी येतील. (Christmas Gift Wrapping Ideas: ख्रिसमस गिफ्ट्स आकर्षक पद्धतीने रॅप करण्यासाठी काही हटक्या आयडियाज Watch Video)
क्रिसमस ट्री ची परंपरा जर्मन लोकांनी सुरू केली असे मानतात. 16 व्या शतकातील संत मार्टिन ल्युथर हे पहिले व्यक्ति होते ज्यांनी आपल्या घरात क्रिसमस ट्री सजवला होता. पूर्वीच्या काळी ओक झाड क्रिसमस ट्री म्हणून सजवायचे. परंतु कालानुरूप क्रिसमस ट्री चे स्वरूप बदलत गेले आणि आता प्लास्टिक आणि विविध स्वरुपात क्रिसमस ट्री उपलब्ध होतो.