Chinchpokli Cha Chintamani Aagman Sohala 2019: चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा 11 ऑगस्टला येणार; पहा आगमन सोहळ्याची वेळ, स्थळ काय?
त्यामुळे या मंडळाच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह दुणावला आहे. 11 ऑगस्ट 2019 दिवशी चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन होणार आहे.
Chinchpokli Cha Chintamani 2019 Aagman Date & Time: महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. 2 सप्टेंबर 2019 ला यंदा गणेश चतुर्थी असल्याने सार्वजनिक आणि घरागुती गणपतीचं या दिवशी आगमन आणि प्रतिष्ठापना होणार आहे. पण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये तयारीला सुरूवात झाली आहे. मुंबईत चिंचपोकळीचा चिंतामणी (Chinchpokli Cha Chintamani) हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा शताब्दी वर्ष साजरं करत आहे. त्यामुळे या मंडळाच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह दुणावला आहे. 11 ऑगस्ट 2019 दिवशी चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन होणार आहे. इथे पहा चिंतामणीची पहिली झलक आणि आगमन सोहळ्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग
चिंतामणीचं शतक महोत्सवी वर्ष असल्याने आगमन सोहळ्याला गणेशभक्त मुंबईकरांची मोठी गर्दी असण्याची शक्यता आहे. ढोल ताशे आणि आरत्यांच्या गजरामध्ये चिंतामणीचं आगमन आणि विसर्जन होत असल्याने या सोहळ्याची गणेशभक्तांमध्ये मोठी क्रेझ आहे. येथे पहा चिंचपोकळीचा चिंतामणी पाटपूजन सोहळा 2019 ची झलक
चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन सोहळा 2019 तारीख, वेळ
चिंतामणीचं आगमन यंदा 11 ऑगस्ट दिवशी होणार आहे. दुपारी 2 च्या सुमारास या जंगी सोहळ्याला सुरूवात होणार आहे. सोशल मीडियामध्ये मंडळाच्या अधिकृत हॅन्डल्सवर देण्यात आलेल्या माहितीनुसार चिंचपोकळी पूल धोकादायक घोषित करण्यात आल्याने यंदा हा आगमन सोहळा गणेश टॉकीज ते चिंतामणी मंडप असा असणार आहे.
मुंबईच्या लालबाग परिसरात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गर्दी असते. त्यापैकी एक असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपती मंडळाची सुरूवात 1920 साली झाली. हळूहळू या मंडळाची ख्याती वाढली. विजय खातू परेल येथील खातूंच्या कार्यशाळेत चिंतामणीची मूर्ती घडवली जाते. चिंतामणीचे मूळ मूर्तिकार विजय खातू यांच्या निधनानंतर हा वसा त्यांच्या मुलीने म्हणजेच रेश्मा खातू हिने चालू ठेवला होता.