Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024 Messages: छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त शिवरायांना अभिवादन करणारे मराठी HD Images आणि Whatsapp Status

इतिहासातील नोंदीनुसार, 3 एप्रिल 1680 साली शिवरायांचा मृत्यू झाला. त्यामुळे शिवप्रेमी दरवर्षी 3 एप्रिलला आपल्या रयतेच्या राजाच्या स्मृतिनिमित्त आपल्या भावना व्यक्त करत त्यांना कार्याला सलाम करतात.

Shivaji Maharaj | File Image

मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी शहाजी भोसले अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 50 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. इतिहासातील नोंदीनुसार, 3 एप्रिल 1680 साली शिवरायांचा मृत्यू झाला. त्यामुळे शिवप्रेमी दरवर्षी 3 एप्रिलला आपल्या रयतेच्या राजाच्या स्मृतिनिमित्त आपल्या भावना व्यक्त करत त्यांना कार्याला सलाम करतात. आदिलशाही विरूद्ध न झुकता मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य स्थापन करणार्‍या या आदर्श व्यक्तिमत्त्वाचा वसा पुढल्या पिढीपर्यंत नेण्यासाठी तुम्ही शिवरायांचे फोटो, Quotes शेअर करू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनी तुम्ही आज WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत या दिवसाचा आनंद तुम्ही द्विगुणित करू शकता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली आई जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. मूठभर मावळ्यांच्या सोबतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि बघता बघता मुघलांप्रमाणेच आदिलशाहीचाही महाराष्ट्रात शेवट केला.

शिवरायांना अभिवादन

Shivaji Maharaj | File Image
यशवंत कीर्तीवंत। सामर्थ्यवंत वरदवंत।
पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।।
छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन
Shivaji Maharaj | File Image
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।
छत्रपती शिवाजी महाराज यांना
स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा!
Shivaji Maharaj | File Image
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज यांना
स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा!
Shivaji Maharaj | File Image
पराक्रमी योद्धा,
कुशल रणनीतिकार,
वीर महानायक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या
पुण्यतिथी निमित्त त्यांस शत शत प्रणाम!
Shivaji Maharaj | File Image
स्वराज्यासाठी लढला तो,
तमाम मराठ्यांसाठी
तळपती आग होता तो
छत्रपती शिवाजी महाराजांच्या
पुण्यतिथी दिवशी विनम्र अभिवादन!

विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध, मुघल साम्राज्याविरुद्ध शिवराय शिताफीने लढले. गनिमी काव्याने शत्रूंशी सामना करत मूठभर मावळ्यांच्या मदतीने त्यांनी परकीय आक्रमणं परतून लावली. त्यांनी हिंदुस्थानामध्ये मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. अशा या पराक्रमी राजाला अभिवादन करून त्यांच्या स्मृतींचं आज स्मरण करायला विसरू नका.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now