Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2022 Messages: छत्रपती शिवरायांच्या पुण्यतिथी निमित्त महाराजांना अभिवादन करणारे मराठी HD Images, WhatsApp Status
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी वयाच्या 50व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची ग्रेगेरियन कॅलेंडर नुसार पुण्यतिथी 3 एप्रिल दिवशी असते. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून परकीय आक्रमणांना परतवून लावणार्या शिवरायांच्या अनेक पराक्रम गाथा आजची आपल्या अंगावर रोमांच आणतात. महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस (Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi) हा आपल्याला त्यांच्या शौर्याचं, पराक्रमाचं स्मरण करण्यासाठी एक खास दिवस आहे. शिवरायांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा वसा पुढील पिढीला देताना आणि राजेंना अभिवादन करण्यासाठी लेटेस्टली मराठी कडून तयार करण्यात आलेले हे वॉलपेपर, HD Images शेअर करून तुम्ही आजच्या दिवशी त्यांच्याप्रति असलेली कृतज्ञता सोशल मीडीयाच्या माध्यमातून नक्कीच अर्पण करू शकता.
छत्रपती शिवाजी महाराज यांचं देहावसान 3 एप्रिल 1680 दिवशी झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी वयाच्या 50व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा छत्रपती संभाजीराजे यांनी कार्यभार सांभाळला. आजही शिवभक्त महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी रायगडावर त्यांच्या स्मृतिस्थळी भेट देऊन अभिवादन अर्पण करतात. नक्की वाचा: Interesting Facts About Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या खास गोष्टी तुम्हालाही देतील प्रेरणा .
शिवरायांच्या पुण्यातिथी निमित्त अभिवादन
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज यांना
स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा!
छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथी निमित्त कोटी-कोटी प्रणाम
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।
छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
यशवंत कीर्तीवंत। सामर्थ्यवंत वरदवंत।
पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।।
छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली आई जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. मूठभर मावळ्यांच्या सोबतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि बघता बघता मुघलांप्रमाणेच आदिलशाहीचाही महाराष्ट्रात शेवट केला.