Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2021: छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त शिवरायांना अभिवादन करणारे मराठी Messages, Images!
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2021 | File Image

Chhatrapati Shivaji Maharaj Death Anniversary: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj) यांची आज पुण्यतिथी. 3 एप्रिल 1680 मध्ये शिवरायांचे रायगडावर निधन झाले. अवघ्या 50 व्या वर्षी महाराजांनी जगाचा निरोप घेतला. सुराज्य, स्वराज्य नांदवून 'रयतेचा राजा' ठरलेल्या महाराजांची आज त्यांची 341 वी पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी निमित्त महाराजांना अभिवादन करणारे मराठी Messages, Images खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करुन शिवरायांना अभिवादन करुया.

महाराजांनी आपल्या पराक्रमांनी, शौर्याने, धाडसाने आणि रयतेप्रती असलेल्या प्रेमाने अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यांनी निर्माण केलेले स्थान इतक्या वर्षांनंतरही आपल्या मनात अढळ आहे. शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु, यंदा त्यावरही कोविड-19 संकटाचे सावट आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2021 Messages: छत्रपती शिवरायांच्या पुण्यतिथी निमित्त Images, WhatsApp द्वारे त्यांच्या स्मृतीस करा वंदन!)

छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिदिन:

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2021 | File Image
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2021 | File Image
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2021 | File Image
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2021 | File Image
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2021 | File Image

शिवरायांच्या संघर्षमय आयुष्यात ते अगदी जिद्दीने लढले. अनेक लढाया, मोहिमा शिवरायांनी मावळ्यांच्या साहाय्याने जिंकल्या. तेजस्वी, प्रेरणादायी, आदर्श अशा राजाला पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम! आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराजांमधील एकतरी गुण अंगिकारुया आणि पुढील पिढीपर्यंत पोहचवूया.