Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2021: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

3 एप्रिल 1680 मध्ये महाराजांचे दीर्घ आजारामुळे निधन झालं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला.

Shivaji Maharaj (Photo Credits: Wikimedia Commons)

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2021: मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे. 3 एप्रिल 1680 मध्ये शिवरायांचे रायगडावर निधन झाले होते. छत्रपतींच्या मृत्यूनंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठ्यांचा राज्यविस्तार होतचं राहिला. या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करून घेतला. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात...(वाचा - Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2021: छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त शिवरायांना अभिवादन करणारे मराठी Messages, Images!)

छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाबाई ह्याचे पुत्र होते. त्यांचा जन्म इ.स. 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांचे नाव शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या शिवाई देवीच्या नावावरून ठेवण्यात आले होते. (वाचा - Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2021 Messages: छत्रपती शिवरायांच्या पुण्यतिथी निमित्त Images, WhatsApp द्वारे त्यांच्या स्मृतीस करा वंदन!)

छत्रपती शिवाजी महाराज हे एक दयाळू राजा होते. 3 एप्रिल 1680 मध्ये महाराजांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला.