Maghi Ganesh Jayanti 2025 Wishes In Marathi: माघी गणेश जयंती निमित्त Messages, Images, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देत साजरा करा गणरायाचा जन्मोत्सव!
गणेश भक्त माघी गणेश जयंतीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही देखील माघी गणेश जयंती निमित्त Messages, Images, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देत हा मंगलमय दिवस आणखी खास करू शकता. यासाठी तुम्ही खालील ग्रीटिंग्ज मोफत डाऊनलोड करू शकता.
Maghi Ganesh Jayanti 2025 Wishes In Marathi: यंदा माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti 2025) शनिवार, 1 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाते. तर फेब्रुवारीला वसंत पंचमी साजरी करण्यात येणार आहे. माघी गणेश जयंती व्यतिरिक्त देशभरात गणेश चतुर्थीचा उत्सव देखील मोठ्या उत्साहाने पार पडतो. गणेश चतुर्थी उत्सव ऑगस्ट/सप्टेंबर महिन्यात (भाद्रपद हिंदू महिना) साजरा केला जातो. हिंदू धर्मात माघी गणेश जयंती उत्सवाचे धार्मिक महत्त्व खूप आहे. भारताच्या विविध भागात विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या भक्ती-भावाने माघी गणेश जयंती उत्सव साजरा केला जातो.
भगवान गणेशाला ज्ञानाचे स्वामी म्हणून ओळखले जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी भगवान गणेशाची पूजा केली जाते. ज्या दिवशी गणपती बाप्पा पुन्हा जिवंत झाले तो दिवस माघ महिन्यातील माघ शुद्ध चतुर्थीचा (अमावास्या नंतरच्या त्या महिन्याचा चौथा दिवस) होता. म्हणून, हा दिवस माघी गणेश उत्सव म्हणून साजरा केला जातो. गणेश भक्त माघी गणेश जयंतीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही देखील माघी गणेश जयंती निमित्त Messages, Images, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देत हा मंगलमय दिवस आणखी खास करू शकता. यासाठी तुम्ही खालील ग्रीटिंग्ज मोफत डाऊनलोड करू शकता.
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा -
मोदकांचा प्रसाद केला,
लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले,
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे,
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
माघी गणेश जयंती निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
आपणांस सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो
ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!

तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता,
अवघ्या दिनांचा नाथा,
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे,
चरणी ठेवितो माथा,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!

बाप्पा आला माझ्या दारी,
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून,
आशीर्वाद दे भरभरुन
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया!
माघी गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी सर्वांना
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!

माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी ही माघी गणेश चतुर्थी किंवा विनायक जयंती म्हणून साजरी केली जाते. माघ महिन्यात गणेशपूजेचे महत्त्व शास्त्रांमध्ये वर्णन केले आहे. माघी गणेश चतुर्थीचा हा उत्सव आतापर्यंत फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकपुरता मर्यादित होता. पण आता तो देशाच्या अनेक भागांमध्ये साजरा केला जात आहे. या दिवशी संकष्टी व्रत पाळले जाते.
(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2025 11:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

