Happy Bhogi 2021 Messages: भोगी निमित्त इंग्रजी Wallpapers, Wishes, WhatsApp Status, HD Images शेअर करून आपल्या आप्त स्वकीयांना द्या खास शुभेच्छा!
भोगी निमित्त Wallpapers, Wishes, WhatsApp Status, HD Images शेअर करून तुम्ही आपल्या आप्त स्वकीयांना सोशल मीडियाच्या माध्यमातून खास शुभेच्छा देऊ शकता.
Happy Bhogi 2021 Messages: पौष महिन्यात येणाऱ्या मकरसंक्रांतीच्या सणाच्या आदल्या दिवशी 'भोगी' चा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीचे तीन दिवस महत्त्वाचे असतात. यात संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या भोगी सणाचे विशेष महत्त्व असते. भोगी शब्दानुसार या सणाला “उपभोगाचा सण” असे देखील म्हटले जाते. या दिवशी एक खास भाजी केली जाते. त्यात बोरे, गाजर, डहाळ्यावरील ओले हरभरे, ऊस, वांगे, घेवड्याच्या शेंगा आणि तीळ अशा विविध गोष्टी टाकल्या जातात. सर्व भाज्या एकत्र करून बनवलेली भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते. (Happy Bhogi 2021 Wishes: संक्रातीच्या आदल्या दिवशी खास मराठी HD Images, Greetings, Wallpapers च्या माध्यमातून द्या भोगी सणाच्या शुभेच्छा)
भोगीच्या दिवशी स्त्रिया सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करतात. नवीन अलंकार परिधान करतात. घरासमोर रांगोळी काढतात आणि उपभोगाचे प्रतिक असणाऱ्या इंद्रदेवाची पूजा करतात. संक्रातीच्या सणाप्रमाणे भोगीच्या सणाच्यादेखील शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. भोगी निमित्त Wallpapers, Wishes, WhatsApp Status, HD Images शेअर करून तुम्ही आपल्या आप्त स्वकीयांना सोशल मीडियाच्या माध्यमातून खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील इंग्रजी मेसेज नक्की उपयोगात येतील. हे इंग्रजी मेजेस डाऊनलोड करून तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शुभेच्छा देऊ शकता. (Makar Sankranti 2021 Messages: मकर संक्राती निमित्त मराठी Wallpapers, Wishes, WhatsApp Status, HD Images शेअर करून मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा)
भोगीच्या दिवशी सुगड पुजण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी यास वाण पूजन प्रथा असेही म्हटले जाते. या दिवशी पाच छोटी मडकी पुजली जातात. भोगीच्या दिवशी पुजलेले सुगड दुसऱ्या दिवशी, मकरसंक्रांतीला मंदिरात घेऊन जातात. संक्रातीच्या दिवशी विवाहित स्त्रिया एकमेकींना हळदी-कुंकू लावतात. तसेच एकमेकींची ओटी भरतात. संक्रातीचा सण स्त्रियांसाठी एक खास परवणीचं असतो.