Bhogi 2021: सुगड पूजन ते भोगीचा बेत मकर संक्रांतीच्या सणाच्या पहिल्या दिवशी काय काय करतात?
तर संक्रांती नंतर क्रिंकांत साजरी करण्याची पद्धत आहे.
Bhogi 2021 Celebrations : संक्रांत हा महाराष्ट्रात ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार साजरा केला जाणारा पहिला सण आहे. भोगी, मकर संक्रांत आणि क्रिंक्रांत असे 3 दिवस हा सण साजरा केला जातो. दरम्यान 14 जानेवारी म्हणजेच उत्तरायणाचा दिवस ही मकर संक्रांत (Makar Sankranti) असते त्याच्या आधीच्या दिवशी भोगी (Bhogi) साजरी केली जाते. तर संक्रांती नंतर क्रिंकांत साजरी करण्याची पद्धत आहे. जानेवारी महिन्यात संक्रांतीचा सण येत असल्याने सहाजिकच थंडीचा गारवा आणि हातात आलेलं ताजं पीक, धन धान्य यांची या सणाच्या निमित्ताने पूजा केली जाते. नवदांपत्यांसाठी, नवजात बालकांसाठी देखील हा सण आनंद घेऊन येतो. मग मकर संक्रांतीच्या आधी भोगी साजरी करताना नेमकं काय काय करतात? हा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर जाणून घ्या भोगीच्या सेलिब्रेशनच्या दृष्टीने काही रीती-भाती.
भोगी दिवशी काय करतात?
- अनेक सवाष्ण महिला भोगी साजरी करायला माहेरी येतात, माहेरी सुगड पूजन केले जाते. भोगीच्या दिवशी सुगड पुजण्याची महाराष्ट्रामध्ये पद्धत आहे. Makar Sankranti 2020 Sugad Puja Vidhi: मकर संक्रांती दिवशी सवाष्ण स्त्रिया का पूजतात सुगड? जाणून घ्या पूजा विधी आणि त्यासाठी लागणारे साहित्य.
- भोगीच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान म्हणजेच केस धुवून आंघोळ करण्याची पद्धत आहे.
- भोगीच्या सणाला जेवणाचा बेत देखील खास असतो. हिवाळ्याचे दिवस असल्याने बाजरीची भाकरी आणि भोगीची विशेष भाजी किंवा खिचडी करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात काही भागामध्ये या दिवसाच्या बेताला खिंदाट देखील म्हटलं जातं. Bhogi Bhaji Recipes: भोगी च्या भाजीपासून त्याच्या कालवणापर्यंत अशा बनवा या लज्जतदार रेसिपीज, नक्की करुन करा.
- महिलांसाठी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदू कुंकवाचे कार्यक्रम सुरू होतात. त्यापैकी पहिला सोहळा भोगीच्या दिवसापासून देखील सुरू करण्याची पद्धत आहे. सवाष्णींना घरी बोलावून सुगडामधील पदार्थांनी त्यांची ओटी भरली जाते. त्यांना वाण दिले जाते. How To Host Haldi Kunku Samarambh: पहिल्यांदा घरी हळदी कुंकू करणार आहात? मग असे करा हळदी कुंकू समारंभाचे प्लॅनिंग .
- भोगीच्या दिवशी भारतात काही ठिकाणी इंद्रदेवाची पूजा करण्याची पद्धत आहे.
दरम्यान संक्रांतीच्या निमित्ताने नवदांमप्त्यांना काळे कपडे परिधान करून त्यांना हलव्याच्या दागिन्याने सजवले जाते. त्यांचं खास औक्षण केले जाते. याप्रमाणेच नवजात बालकांना देखील बोरन्हाण करण्याची पद्धत आहे. मकर संक्रांत ते रथ सप्तमी या काळात महिला एकमेकांकडे हळदी कुंकवाच्या कार्यक्रामाला जातात. वाण लुटतात.