Bhaubeej 2021 Tika Muhurat: भाऊबीज दिवशी भावाच्या औक्षणासाठी पहा काय आहे शुभ मुहूर्ता ची वेळ
भाऊबीजेचा सण कार्तिक महिन्याच्या द्वितीयेला साजरा होत असल्याने तो यम द्वितीया म्हणून देखील ओळखला जातो.
दिवाळी सणाची सांगता भाऊबीजेने (Bhaubeej) होते. यंदा भाऊबीज शनिवार 6 नोव्हेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. यम द्वितीया (Yam Dwitiya) म्हणून देखील हा दिवस ओळखला जातो. भारतामध्ये बहीण-भावाचं प्रेम, जिव्हाळा वृद्धिंगत व्हावा म्हणून हा सण साजरा केला जातो. बहिण भावाचं औषण करते आणि ओवाळणी म्हणून भाऊ बहिणीला काही वस्तू भेटवस्तू म्हणून देतो. हिंदू धर्मामध्ये सण-समारंभामधील सारे महत्त्वाचे दिवस हे शुभ मुहूर्त पाहून साजरे करण्याची रीत आहे. मग यंदा तुम्ही देखील भाऊबीजेचा सण हा शुभ मुहूर्तावर (Bhaubeej Shubh Muhurat) साजरा करणार असाल तर पहा यंदाचा ओवाळणीच्या शुभ मुहूर्ताची वेळ काय आहे?
भाऊबीजेचा सण कार्तिक महिन्याच्या द्वितीयेला साजरा होत असल्याने तो यम द्वितीया म्हणून देखील ओळखला जातो. द्रिक पंचागच्या माहितीनुसार, यंदा भाऊबीजेसाठी टीका लावून ओवाळणी करण्याचा शुभ मुहूर्त दुपारच्या वेळेस 1 वाजून 30 मिनिटं ते 3 वाजून 46 मिनिटं आहे. या 2 तास 11 मिनिटांच्या काळात तुम्ही भाऊबीज साजरी करू शकता. तर यंदा दिवाळीत यम द्वितीया तिथी 5 नोव्हेंबरला रात्री 11 वाजून 14 मिनिटांनी सुरू होणार असून 6 नोव्हेंबरला संध्याकाळी 7 वाजून 44 मिनिटांनी संपणार आहे. नक्की वाचा: Diwali 2021 Invitation Messages Formats in Marathi: दिवाळीच्या शुभेच्छा शेअर करत आप्तांना, मित्रांना फराळाचं ऑनलाईन आमंत्रण देण्यासाठी खास मेसेजेस.
हिंदू पुराणातील कथांनुसार, मृत्यूदेव यम हे आपली बहीण यमी हिच्याकडे जाऊन तिला वस्त्रालंकार देऊन , भोजनाचा आनंद घेऊन आले होते तो दिवस म्हणजे यमद्वितिया. त्यामुळे आजही भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जाऊन या दिवसाचा जिव्हाळा जपतो. बहिणीकडे जेवण करून, ओवाळणी करून घेऊन तिला भेटवस्तू देऊन त्यांच्यामधील नात्याचा गोडवा वृद्धिंगत करतो. यासाठी प्रार्थना केली जाते.
टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.