Bhaubeej 2020 Shubh Muhurat: यंदा भाऊबीज दिवशी कोणत्या वेळेत कराल भावांची ओवाळणी; जाणून घ्या शुभ मुहूर्त!
भाऊ-बहीणा ओवाळणी आणि गिफ्ट देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणित करतो
दिवाळी (Diwali) सणाची सांगता सोमवार, 16 नोव्हेंबर दिवशी भाऊबीज (Bhaubeej) आणि दिवाळी पाडवा (Diwali Padwa) या सणांनी होणार आहे. भाऊबीज हा दिवाळीच्या धामधूमीमधील शेवटचा सण असतो. या दिवशी बहीण-भावाचं नातं अधिक दृढ करण्यासाठी यम द्वितिया साजरी केली जाते. बहीण भावाचं औक्षण करून त्याच्या सुखी आयुष्यासाठी कामना करते. भाऊ-बहीणा ओवाळणी आणि गिफ्ट देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणित करतो. यंदा पाडवा आणि भाऊबीज एकत्र आल्याने नेमकी भावाची ओवाळणी कधी करायची असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर जाणून घ्या भाऊबीज 2020 मधील यंदाचा भावाच्या ओवाळणीचा नेमका मुहूर्त कधी आहे?
भारतामध्ये भावा-बहीणाच्या प्रेमाचा, स्नेहाचा धागा वर्षागणिक दृढ करण्यासाठी रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोन महत्त्वाचे सण आहेत. दिवाळीत कार्तिक शुक्ल द्वितीयेला यम द्वितिया म्हणजेच भाऊबीज साजरी केली जाते. Bhaubeej 2020 Messages: भाऊबीज निमित्त SMS, Messages, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून द्या आपल्या भावंडांना खास शुभेच्छा!
भाऊबीज 2020 मध्ये कधी कराल ओवाळणी?
drikpanchang च्या माहितीनुसार,
द्वितीया तिथी प्रारंभ- 16 नोव्हेंबर 2020 सकाळी 07:06 वाजल्यापासून
द्वितीया तिथी समाप्ती- 17 नोव्हेंबर 2020 सकाळी 03:56 वाजता
भाऊबीज ओवाळणीचा शुभ मुहूर्त- दुपारी 01:10 ते 03:18 पर्यंत
अभिजीत मुहूर्त- सकाळी 11: 44 ते 12:27 वाजेपर्यंत.
पुराणामधील कथांनुसार, मृत्यूदेव यम हे आपली बहीण यमी हिच्याकडे जाऊन तिला वस्त्रालंकार देऊन , भोजनाचा आनंद घेऊन आले होते. तो हा दिवस यमद्वितिया. त्यामुळे आजही भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जाऊन हा सण साजरा करतो. तिच्याकडे जेवण करून, ओवाळणी करून घेऊन तिला भेटवस्तू देऊन त्यांच्यामधील नात्याचा गोडवा वृद्धिंगत करतो.