Bhagwat Ekadashi 2019: भागवत एकादशी निमित्त जाणून घ्या पूजाविधी आणि एकादशी व्रताचे महत्त्व

यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते. परंतु, भागवत एकादशीला नाव नसते. यावेळी 22 नोव्हेंबरला उत्पत्ति एकादशी तर 23 नोव्हेंबरला भागवत एकादशी (Bhagwat Ekadashi 2019) साजरी होणार आहे.

Lord Vishnu (Photo credits: Facebook)

Bhagwat Ekadashi 2019: हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तीभावाने ठेवले जाते. या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते. प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11 व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. 'एकादशी' ही विष्णूची तिथी असून या दिवशी विष्णु भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात. एकादशीच्या दुसर्‍या दिवशी उपवास सोडला जातो. एकादशीत 'स्मार्त' आणि 'भागवत', असे दोन भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे दोन भेद येतात. त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी 'स्मार्त' व दुसर्‍या दिवशी 'भागवत', असे लिहिलेले असते. अनेकदा एका पक्षात 'स्मार्त' आणि 'भागवत', अशा एका पाठोपाठ दोन एकादशी असतात. यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते. परंतु, भागवत एकादशीला नाव नसते. यावेळी 22 नोव्हेंबरला उत्पत्ति एकादशी तर 23 नोव्हेंबरला भागवत एकादशी (Bhagwat Ekadashi 2019) साजरी होणार आहे. या दिवशी भगवान विष्णुंची पूजा कशा पद्धतीने करावी तसेच एकादशीचे नेमकं महत्त्व काय याविषयी जाणून घेऊयात...(हेही वाचा - Utpanna Ekadashi 2019: उत्पत्ति एकादशी निमित्त जाणून घ्या व्रत, कथा, पूजाविधी आणि शुभ मुहूर्त)

भागवत एकादशी पूजाविधी -

या महिन्यामध्ये कार्तिकी कृष्ण पक्षात स्मार्त एकादशी 22 नोव्हेंबरला व भागवत एकादशी 23 नोव्हेंबरला असणार आहेत. या दोन एकादशी आल्याने वारकरी सांप्रदायातील परंपरेने 23 नोव्हेंबरची कार्तिकी एकादशी साजरी होणार आहे. यामुळे द्वादशी 24 नोव्हेंबरला व त्रयोदशीला 25 नोव्हेंबरला साजरी करण्यात येणार आहे. वारकरी सांप्रदायात भागवत एकादशी साजरी केली जाते.

हेही वाचा - Sankashti Chaturthi 2019: संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या गणपती बाप्पाच्या 'या' खास आवडत्या गोष्टी

या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते. या दिवशी लोक दिवसभर उपवास करतात. भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा व विश्वासाने केले जाते. या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते. या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या, तीर्थ स्नान व दान या सर्वांपासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळते.

एकादशीचे महत्त्व -

एकादशीचे व्रताचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मासात दोन याप्रमाणे वर्षामध्ये 24 एकादशी येतात. यातील चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी यांचा समावेश होतो.

दरम्यान, कृष्ण पक्षात पापमोचनी, वरुधिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षट्‌तिला व विजया या एकादशींचा समावेश होतो. एकादशीच्या दिवशी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास केला जातो. यादिवशी विष्णुंच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif