Banjara Community Diwali Celebration: अविवाहित मुलींची अनोखी दिवाळी, जाणून घ्या बंजारा समाजात कशी साजरी करता दिवाळी

बंजारा समाज अर्थात गोरमाटी लोक अविवाहित मुलींना लक्ष्मीचं रुप मानतात.

Banjara Diwali Celebration

Banjara Community Diwali Celebration:  भारतात ठिकठिकाणी दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीत सगळीकडे लक्ष्मीपूजन, दिवे, रांगोळी, मिठाई, केलेच जातात. पण बंजारा समाजात दिवाळी ही पारंपारिक आणि  आगळ्या वेगळ्या पध्दतीनं साजरा केली जाते.  बंजारा समाज अर्थात गोरमाटी लोक अविवाहित मुलींना लक्ष्मीचं रुप मानतात. त्यामुळे बंजारा समाजात अविवाहित मुलींना विशेष महत्त्व दिले जाते. बंजारा समाजात गावातल्या मुली एकत्र येऊन दिवा घेऊन घरोघरी फिरतात आणि मेरा मागतात. पण या मुली नेमकं अस का करतात? या गोष्टीला दिवाळी फार शुभ मानलं जातं.

बंजारा समाजात दोन विशेष सण महत्त्वाचे मानले जाते. एक दिवाळी आणि दुसरा तीज. समाजात दिवाळी केवळ २ दिवसांची साजरी केली जाते. दिवाळीला गोरमाटी अर्थात बंजारी भाषेत दवाळी असं म्हणतात. लक्ष्मी पूजनच्या दिवशी तांड्यातील अविवाहित मुली साज श्रृंगार करून एकत्र येतात. सांयकाळी सर्वीजण एकत्र येतात. हातात दिवे किंवा पणती घेऊन बोली भाषेत गीत गातात. दिवा घेऊन सर्व प्रथम मंदिरात जाता. हातात दिवा घेऊन तांड्यातील प्रत्येकाच्या घरी जातात. तिथे त्यांची लक्ष्मीच्या रुपाने ओवाळणी करतात.त्यानंतर गीत गात ते मेरा मागतात. ( मेरा मागणं म्हणजे पैसे मागणं ) पैसे मागण्या वेळीस मुली एका सुरात गीत गातात.

याडी तोण मेरा

बापू तोण मेरा

वर्शेदाडेरी कोड दवाळी

बापू तोण मेरा

 

View this post on Instagram

 

A post shared by aai_george (@aai_george)

आदरणीय मोठ्या व्यक्तींकडून मेरा मागितला जातो. अर्थात गावातील बापू किंवा माईकडे ही ओवाळणी  मागितली जाते. बापू मी तुला ओवाळत आहे तू मला मेरा दे आणि वर्षातला मोठा दिवस तू मला आशिर्वाद दे. असा याचा अर्थ होतो. त्यावेळी खुश होऊन प्रत्येक जण आपआपल्या परिने त्यांना आशिर्वादरुपी पैसे देतात. ज्याच्याही घरी मुली दिवा घेऊन जातात त्यांच्या घरी लक्ष्मी येते आणि त्यांना समृध्दी प्राप्त होते अशी धार्मिकवृत्ती आहे.