IPL Auction 2025 Live

Balasaheb Thackeray Jayanti 2023: 'ठाकरे' आडनावाच्या स्पेलिंग पासून ते राजकारणाशिवाय बाळासाहेब कशात रमायचे? घ्या जाणून खास गोष्टी

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यामध्ये 23 जानेवारी 1926 दिवशी झाला तर मृत्यू वृद्धापकाळामुळे मुंबई मध्ये मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी 17 नोव्हेंबर 2012 दिवशी झाला.

Balasaheb Thackeray (Photo Credits: shivsena.in)

बाळ केशव ठाकरे अर्थात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) शिवसेना पक्षाच्या स्थापनेनंतर हळूहळू बदलत्या राजकीय प्रवाहासोबत बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुहृद्यसम्राट झाले. आपल्या ठाम आणि बेधडक स्वभावामुळे, राजकीय भूमिकांमुळे ते जनसामान्यांसोबतच अनेक स्थानिक आणि देश पातळीवरील राजकीय पक्षांसोबत, नेत्यांसोबत जोडले गेले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या बाळ ठाकरे यांचा देशभर पसरलेला दबदबा आजही अनेकांना थक्क करणारा आहे. त्यामुळे आज त्यांच्या जन्मदिनी जाणून घेऊ त्यांच्याबद्दल काही खास आणि विरळाने लोकांना ठाऊक असलेल्या काही खास गोष्टी!

बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल खास गोष्टी

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यामध्ये 23 जानेवारी 1926 दिवशी झाला तर मृत्यू वृद्धापकाळामुळे मुंबई मध्ये मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी 17 नोव्हेंबर 2012 दिवशी झाला. बाळासाहेबांच्या मृत्यूपश्चात शिवसेना पक्षाची धुरा उद्धव  ठाकरे सांभाळत आहेत.