Bal Thackeray Jayanti 2022: बाळ ठाकरे जयंती निमित्त WhatsApp Status, HD Images शेअर करत साजरा करा शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिवस!

त्यांचा जन्म 23 जानेवारी 1926 साली प्रबोधनकार ठाकरे आणि रमाबाई ठाकरे यांच्या पोटी पुण्यात झाला होता.

Bal Thackeray Jayanti | File Image

शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे (Bal Thackeray) यांचा जन्मदिवस 23 जानेवारीला असल्याने हा दिवस बाळ ठाकरे जयंती (Bal Thackeray Jayanti)  म्हणून साजरा केला जात आहे. महाराष्ट्र राज्य सरकार कडून 31 डिसेंबर 2021 दिवशी जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार आता 23 जानेवारी हा दिवस 'बाळ ठाकरे जयंती' म्हणून राज्यात साजरा केला जाणार आहे. लाखो शिवसैनिकांसाठी बाळ ठाकरे हे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोशल मीडीयात बाळ ठाकरे जयंती निमित्त Wishes, Messages, WhatsApp Status म्हणून लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेले हे फोटोज तुम्ही डाऊनलोड करून शेअर करू शकता.

बाळ ठाकरे यांना 'हिंदुहृदयसम्राट' म्हणून देखील ओळखले जाते. यंदा बाळासाहेबांची 96 वी जयंती आहे. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1926 साली प्रबोधनकार ठाकरे आणि रमाबाई ठाकरे यांच्या पोटी पुण्यात झाला होता. शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, दर्दी रसिक असणार्‍या बाळासाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अनेकांना प्रेरणा देते. नक्की वाचा: Bal Thackeray Birth Anniversary: बाळ ठाकरे यांच्या जयंती निमित्त पहा त्यांचे खास फोटोज आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातील काही गोष्टी (View Pics) .

बाळ ठाकरे जयंती  

Bal Thackeray Jayanti | File Image
Bal Thackeray Jayanti | File Image
Bal Thackeray Jayanti | File Image
Bal Thackeray Jayanti | File Image
Bal Thackeray Jayanti | File Image

महाराष्ट्रात मराठी अस्मिता आणि भूमिपुत्रांच्य्या न्याय व हक्कांसाठी बाळासाहेबांनी लढा उभारला होता. त्यामधूनच शिवसेना पक्षाची स्थापना झाली. त्यांनी अनेक नेते घडवले. सध्या बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आहेत. पण बाळासाहेब यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. ते कायम 'किंगमेकर'/ रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत राहिले. आज त्यांच्या जन्मदिनी स्मृतींना वंदन करून काही खास आठवणी नक्की शेअर करा.