Eid al-Adha Wishes 2022: बकरी ईद निमित्त शुभेच्छांसाठी खास Wishes, WhatsApp Status, Messages, Greetings, साजरा करा ईद-उल-अजहा
यंदा बकरी ईद 10 जुलै 2022 (रविवार) रोजी साजरी होत आहे. ईद उल फितर नंतर 70 दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते. ज्याला ईद-उल-अजहा (Eid al-Adha 2022) असेही म्हणतात. कुर्बनीचा उत्साह म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
Bakri Eid 2022: इस्लाम धर्मियांच्या प्रमुख सणांपैकी एक असलेला सण म्हणजे बकरी ईद. यंदा बकरी ईद 10 जुलै 2022 (रविवार) रोजी साजरी होत आहे. ईद उल फितर नंतर 70 दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते. ज्याला ईद-उल-अजहा (Eid al-Adha 2022) असेही म्हणतात. कुर्बनीचा उत्साह म्हणून हा दिवस साजरा केला जातो. अल्ला प्रति हा दिवस समपर्मित असतो. या सणानिमित्त मुस्लीम बांधवांसोबत खास Wishes, WhatsApp Status, Messages, Greetings शेअर करून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी HD Image आपण येथून घेऊ शकता. ईद-उल-अजहाला हजरत इब्राहिम यांच्या कुर्बानीचे स्मरण म्हणून मानले जाते. हजरत इब्राहिम अल्लाच्या आदेशावर आपली निष्ठा दाखविण्यासाठी आपला मुलगा इस्माईलची कुर्बानी देण्यास तयार होतो. जेव्हा हजरत इब्राहिम आपल्या मुलाची कुर्बानी देण्यासाठी पुढे झाले तेव्हा अल्लानेही त्यांची निष्ठा पाहून इस्माईलची कुर्बानी बकऱ्यात परावर्तीत केली. इस्लमाम धर्माच्या धार्मिक मान्यतेनुसार हजरत इब्राहिम अल्लाचे पैगंबर होते.
भारतात 2022 मध्ये 10 जुलै रोजी साजरी होत आहे. ईद उल अजाहा इस्लामी कॅलेंडरचा 12 वा आणि शेवटचा महिना असतो. या दिवशी आनंद साजरा करण्यसाठी आणि गरिबांना, दीनदुबळ्यांना मदत केली जाते. कुर्बानीचे प्रसाद नागरिकांना दिला जातो. ज्या लोकांना एकवेळचे अन्नही मिळत नाही. अशा लोकांना दानधर्म केला जातो. नमाज अदा करण्यापूर्वी बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. त्यानंतर कुटुंबातील सदस्य, शेजारी ते गरिबांसोबत भक्षणही करतात. (हेही वाचा, Happy Bakrid Mubarak Wishes: 'बकरी ईद'च्या निमित्ताने मुस्लीम बांधवांना खास Greetings, Messages, WhatsApp Status शेअर करून द्या 'ईद-उल-अजहा'च्या शुभेच्छा)
इद उल जुहा दरम्यान लोक मशिद किंव ईदगाह येथे जमा होतात. आपल्या बांधवांसोबत नमाज अदा करतात. हा नमाज सकाळी आयोजित होतो. सांगितले जाते की, हे प्रेम, निस्वार्थता आणि बलिादान यांच्या भावनेप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस एकात्मका आणि बंधुभाव वाढीस लागावा म्हणून साजरा होतो.