Bakri Eid 2019: बकरी ईद निमित्त या खास ट्रेंडी मेहेंदी डिझाइन्स नक्की ट्राय करून पहा
यंदा सोमवारी, म्हणजेच 12 ऑगस्ट 2019 ला देशभरात बकरी ईद (Bakra Eid) निमित्त मोठा सोहळा पार पडणार आहे. मुस्लिम बांधवांसाठी हा सोहळा खास मानला जातो. खरंतर कोणताही सण म्हंटल की त्यासोबत नटण्या-सजण्याची संधीही जोडून येते. मुस्लिम महिला या दिवशी खास तयारी करतात, ठेवणीतले खास कपडे घालून , शृंगार करून त्या आपला दिवस खास करतात. Bakri Eid 2019: का साजरी केली जाते बकरी ईद? जाणून घ्या यामागच्या त्यागाची आणि बलिदानाची कथा
पूर्वीच्या काळी हातावर शुभ शकुन म्ह्णून मेहेंदीचे ठिपके काढण्याची पद्धत होती कालांतराने अनेक महिला हातभर मेहेंदी काढू लागल्या. हे बदलते ट्रेंड आता अरेबिक मेहेंदीवर येऊन थांबले आहेत. हातावर नाजुकशी नक्षी छोटी फुले, वेली यांनी सजवलेले हात तुमच्या सौंदर्यात भर टाकतात. यासाठी अनेक जण महागड्या डिझायनरला सुद्धा बोलवतात. पण जर तुम्हाला वेळ आणि पैसे खर्च न करता घरच्याघरी तुमचे हात मेहेंदीने सुंदर बनवायचे असतील तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत या खास ट्रेंडी मेहेंदी डिझाइन्स.. एकदा नक्की पहा..
#mywork #mehendibyprajakta #instagood #instalike #hennainspire #wed
बकरी ईद या सणाला ईद उल जुहा असेही म्हणतात. ईद-उल-जुहा हजरत इब्राहिमने केलेल्या त्यागाप्रित्यर्थ साजरा केला जातो. यादिवशी बकऱ्याचे बळी देण्याची रीत आहे. यानिमित्त ठिकठकाणी बकऱ्याच्या मटणाच्या मेजवान्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमात नातेवाईक मित्र मैत्रणी यांची भेट होते, अशावेळी तुमच्या हातावरची ही मेहेंदी भाव खाऊन जाईल हे नक्की!