Bail Pola 2024 Messages in Marathi: बैलपोळ्याच्या शुभेच्छा WhatsApp Status, Wishes, Quotes द्वारा शेअर करत साजरा करा सण बळीराजाचा

आषाढ, श्रावण आणि भाद्रपद अशा तीन ही महिन्यात बैल पोळा साजरा करण्याची परंपरा आहे, विविध प्रांतवार या सणाला बेंदूर, पोळा आणि नंदी पोळा अशी नावे पडली आहेत.

Bail Pola | File Image

श्रावण महिन्यातील अमावस्या ही पिठोरी अमावस्या (Pithori Amavasya) म्हणून देखील साजरी केली जाते. कृषिप्रधान भारत देशामध्ये या पिठोरी अमावस्येला बैलपोळा (Bail Pola) देखील साजरा केला जातो. यंदा हा बैल पोळ्याचा सण 2 सप्टेंबर 2024 दिवशी साजरा केला जाणार आहे. मग शेतात बळीराजासोबत कष्ट करणार्‍या बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळ्याच्या शुभेच्छा शेअर करत ही भावना देखील व्यक्त करा. बैलपोळ्याच्या शुभेच्छा WhatsApp Status, Sticker, Wishes, Messages, Quotes द्वारा शेअर करत बैलपोळ्याचा हा आनंद द्विगुणित करा.

बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना शेतीच्या कामामधून सुट्टी दिली जाते. या दिवशी बैलांना स्वच्छ आंघोळ घालून त्यांचा साजशृंगार केला जातो. गोडाधोडाचे पदार्थ दिले जातात मग या दिवशी आपणही शेतकर्‍यांच्या या आनंदात सहभागी होऊ. नक्की वाचा: Bail Pola Wishes 2024: बैल पोळ्याचे Wishes, HD Wallpapers आणि GIF Images च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा संदेश, पाहा .

बैलपोळ्याच्या शुभेच्छा

सण आला आनंदाचा,
माझ्या सर्जा राजाचा,
ऋणं त्याचे माझ्या भाळी,
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

आज आला सण बैलाचा,
त्याच्या कौतुक सोहळ्याचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचे देणे,
बैला, तुझा खरा सण,
शेतकऱ्या तुझा रीन,
बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा

कष्ट हवे मातीला,
चला जपुया पशुधनाला,
 बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

बैलपोळ्याप्रमाणेच बेंदूरही साजरा करत त्या दिवशी बळीराजाच्या या सवंगड्याचे लाड केले जातात. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ही या सणाचं सेलिब्रेशन होते. भारतीय सण उत्सव हे सर्वसमावेशक संस्कृतीचे खरे दर्शन घडवतात. प्राण्याला सुद्धा देवाप्रमाणे मान देणे याहून मोठा कृतज्ञ भाव सापडणार नाही. बैलपोळा हे निश्चितच या भावाचे समर्पक उदाहरण आहे.  आषाढ, श्रावण आणि भाद्रपद अशा तीन ही महिन्यात बैल पोळा साजरा करण्याची परंपरा आहे, विविध प्रांतवार या सणाला बेंदूर, पोळा आणि नंदी पोळा अशी नावे पडली आहेत.