Bail Pola 2020 HD Images: बैल पोळा सणाच्या निमित्ताने खास Messages, Whatsapp Status, Wallpapers, Wishes च्या माध्यमातून द्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा

श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार बैल पोळा (Bail Pola 2020) हा बैलांचा सण साजरा केला जातो. यंदा मंगळवार, 18 ऑगस्ट रोजी हा सण साजरा होणार आहे.

Bail Pola 2020 (File Image)

श्रावण महिन्यात हिंदू धर्मामध्ये अनेक सण-उत्सव साजरे होतात. श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार बैल पोळा (Bail Pola 2020) हा बैलांचा सण साजरा केला जातो. यंदा मंगळवार, 18 ऑगस्ट रोजी हा सण साजरा होणार आहे. इतर सणांप्रमाणे या सणावरही कोरोना विषाणूचे (Coronavirus) सावट असल्याने, हा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बैल पोळा हा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण असून, ज्यांच्याकडे शेती नाही ते या दिवशी मातीच्या बैलाची पूजा करतात. हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असून या दिवशी त्यांची खास पूजा केली जाते.

पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते. पोळ्याला बैलांना नदी, ओढय़ात नेऊन स्वच्छ अंघोळ घातली जाते. नंतर बैलाच्या खोंडाला हळद व तुपाने शेक दिला जातो. त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल घातली जाते. त्यांच्या संपूर्ण शरीरावर रंगरंगोटी केली जाते. शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, वेसण, नवा कासरा व खायला गोड पुरणपोळी असा या दिवशी बैलांचा थाट असतो.

तर अशा या बैल पोळा सणाच्या शुभेच्छा तुम्ही Wishes, Images, WhatsApp Status, Messages, HD Images च्या माध्यमातून देऊ शकता

बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola 2020

बैलपोळ्याच्या शुभेच्छा!

Bail Pola 2020

शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola 2020

बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

Bail Pola 2020

शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola 2020

बैल पोळ्याच्या शुभेच्छा!

Bail Pola 2020

(हेही वाचा: बैल पोळा सणाच्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन चैतन्यमय वातावरणात साजरा करा हा उत्सव!)

दरम्यान, सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता घरातच बैलांची पूजा होणार आहे. कुठेही बैलांची मिरवणूक काढण्यास मनाई आहे. ज्या दिवशी बैल पोळा साजरा होता त्या पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात. दिवसभर उपवास करून सायंकाळी स्नान करतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करण्याची प्रथा काठी ठिकाणी आहे.



संबंधित बातम्या

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

Maharashtra Cabinet Expansion: ‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं...'; मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने Chhagan Bhujbal यांचे राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद