Ashura 2019: 'मोहरम' च्या 10 व्या दिवसाला 'यौम-ए-आशुरा' का म्हणतात? जाणून घ्या या दिवसाचे महत्व आणि इतिहास
खासकरुन शिया मुसलमान हा महिना 'दु:खाचा महिना' म्हणून मानतात. तसेच मोहरमच्या महिन्यातील 10 वा दिवस फार महत्वाचा असून त्याला 'यौम-ए-आशुरा' असे म्हटले जाते.
Youm-e-Ashura 2019: मोहरम इस्लामिक कॅलेंडरमधील पहिला महिना असल्याने मुस्लिम बांधवांमध्ये या महिन्याचे महत्व अधिक आहे. खासकरुन शिया मुसलमान हा महिना 'दु:खाचा महिना' म्हणून मानतात. तसेच मोहरमच्या महिन्यातील 10 वा दिवस फार महत्वाचा असून त्याला 'यौम-ए-आशुरा' असे म्हटले जाते. अरबी भाषेत 'आशुरा' याचा अर्थ 'दहावा दिवस' असा आहे. शिया मुसलमान मोहरम महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत पैगंबर मुहम्मद यांचा नातू इमाम हुसैन आणि त्यांच्या परिवाराच्या वीरगतिसाठी शोक व्यक्त करतात. मोहरमचा महिना 1 सप्टेंबर पासून सुरु झाला असून यौम-ए-आशुरा 10 सप्टेंबर रोजी आहे.
मोहरम महिना शिया आणि सुन्नी समाजातील मुसलमान बांधव फार महत्व देतात. तसेच विविध मान्यतानुसार मोहरम साजरा करण्याचे विविध प्रकार आहेत. मोहरम वेळी चंद्र दिसून येतो आणि सर्व शिया मुसलमानांच्या घरात आणि इमामबाडांमध्ये मजलिसोंची सुरुवात होते. पैगंबर मुहम्मद यांचा नातू इमाम हुसैन यांच्या वीरगतीच्या दुखात यात्रा काढली जाते.
काय आहे याचा इतिहास आणि महत्व?
शिया मुसलमानांसाठी आशुरा इमाम हुसैन यांच्या वीरगतीनिमित्त शोक व्यक्त केला जातो. इस्लाम धर्माच्या मान्यतेनुसार, आशुराच्या दिवशीच हजरत इमाम हुसैन, त्यांचा मुलगा, घरातील मंडळी आणि अन्य साथिदारांना कर्बला येथील एका मैदानात ठार मारण्यात आले होते. कर्बला एक छोटासा कस्बा असून तो इराकची राजधानी बगदाद पासून 100 किमी दूर उत्तर-पूर्व येथे स्थित आहे. हिजरी कॅलेंडरच्या पहिल्या महिन्यात मुहर्रमच्या 10 व्या तारखेला इमाम हुसैन आणि त्यांच्या परिवाराची खलीफा यजीद बिन मुआविया यांच्या लोकांनी हत्या केली होती.
असे सांगितले जाते की, या धर्म युद्धात एका बाजूला इमाम हुसैन यांच्या सोबत 72 लोक होते तर दुसऱ्या बाजूला यजीदचे 40,000 सैनिकांची फौज होती. मात्र हजरत हुसैन यांच्या फौजेत काही मासूम लोक होते त्यांनी हे युद्ध लढले. त्यांच्या फौजचे कमांडर अब्बास इब्ने अली होते. तर दुसऱ्या बाजूला यजीद यांची विशाल सेनेची कमान उमर इब्ने सअद यांच्या हातात होती.
प्रचलित मान्यता नुसार, इराक यजीद नावाचा एक क्रुर राजा होता. या राजाचे वडिल आणि उमैया वंशाचे संस्थापक मुआबिया यांच्या मृत्यूनंतर स्वत:ला इस्लामी जगतातील खलीफ म्हणून घोषित केले. यजीदने हजरत मुहम्मद यांचा नातू हजरत हुसैन याला त्यांच्या सैन्यात दाखल होण्यासाठी आमंत्रण दिले. मात्र या आमंत्रणाला हजरत हुसैन याने नकार दिला. असे म्हटले जाते की, याच कारणामुळे यजीदने हुसैन याच्या विरोधात युद्धाचे बंड पुकारले. इराक मध्ये झालेल्या या धर्मयुद्धात हजरत हुसैन याचा परिवार आणि मित्रपरिवारासह शहीद झाले होते.(Muharram 2019: भारतात उद्यापासून होणार हिजरी नवीन वर्षाची सुरुवात; जाणून घ्या या दुःखद पर्वाचे महत्व)
दरम्यान यौम-ए-आशुरा 10 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी शिया समाजातील लोक काळ्या रंगाचे कपडे घालून इमाम हुसैन आणि त्यांचाया परिवाराच्या वीरगतीची आठवण ठेवत दुख व्यक्त करतात. त्याचसोबत रस्त्यांवर यात्रा काढली जाते. मुहर्रम या महिन्याला दुखाचा महिला मानला जातो. त्यामुळे या महिन्यात शिया मुसलमान सर्व प्रकारच्या सणांपासून दूर राहतात. तसेच बहुतांश या समाजातील लोक काळ्या रंगाचे कपडे घालतात.