Ashadhi Ekadashi 2026 Wishes in Marathi: आषाढी एकादशीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes द्वारा शेअर करत साजरा करा सोहळा विठूमाऊलीचा
आषाढी वारी महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. पंढरपूरात लाखो वारकरी आषाढी एकादशी निमित्त दाखल होत मंगलमय सोहळ्याचा आनंद द्विगुणित करतात. मग तुमच्या कुटुंबियांनाही या सोहळ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी ही मराठमोळी शुभेच्छापत्रं डाऊनलोड करून शेअर करा.
आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) हा वारकरी संप्रदयातील एक मोठा उत्सव आहे. विठूनामाचा गजर करत महाराष्ट्रातील गावागावांमधून वारकरी मंडळी मजल दरमजल करत पंढरपूरामध्ये विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनाला पोहचतात. हिंदू पंचंगानुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला 'आषाढी एकादशी' साजरी केली जाते. आषाढी एकादशीचा दिवस हा देवशयनी एकादशी ( Devshayani Ekadashi) चा दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. यंदा महाराष्ट्रात ही आषाढी एकादशी 25 जुलै दिवशी साजरी केली जाणार आहे. मग या मंगलमय सोहळ्याच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook, Instagram Messages, Wishes, Quotes च्या माध्यमातून देऊन तुम्ही तुमच्या मित्रमंडळी, नातलगांना देत हा दिवस अधिक खास करू शकता.
आषाढी एकादशी निमित्त अनेक भाविक दिवसभर उपवास करतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्ट्या देखील आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी/देवशयनी एकादशी दिवशी देव पुढील चार महिन्यांसाठी निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. नक्की वाचा: Ashadhi Ekadashi Rangoli: आषाढी एकादशी निमित्त विठूमाऊलींच्या रांगोळी साकारत साजरा करा देवशयनी एकादशीचा सण .
आषाढी एकादशीच्या मराठमोळ्या शुभेच्छा
विठु माऊली उभी विटेवरी,
कृपा करी तिच्या भक्तांवरी।
आषाढी एकादशीच्या शुभ दिनी,
सुख लाभो तुम्हा आयुष्यभरी

सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे !
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा

चला पंढरीसी जाऊ,
रखमादेवीवरा पाहू,
डोळे निवतील कान,
मना तेथेचि समाधान,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा,
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील विविध गावांमधून पंढरपूर पर्यंत एक सामुदायिक पदयात्रा काढली जाते. हीच आषाढी वारी महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. धर्म,पंथ, जात, भेद दूर सारून एकतेच्या भावनेतून लाखो भक्तजण वारीमध्ये सहभागी होतात. ’पंढरीचा वास, चंद्रभागास्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

