Ashadhi Ekadashi 2021 Wishes: आषाढी एकादशी मराठी शुभेच्छा, Quotes, Messages Facebook, WhatsApp द्वारा शेअर करत विठ्ठल भक्तांचा दिवस करा मंगलमय

Ashadi Ekadashi Wishes in Marathi आज फेसबूक, व्हॉट्सद्वारा शेअर करत विठ्ठल रूक्मिणीच्या भक्तांना द्या आषाढी देवशयनी एकादशीच्या शुभेच्छा.

Ashadhi Ekadashi | File Image

Ashadi Ekadashi Wishes in Marathi: आषाढ शुक्ल एकादशीचा दिवस म्हणजे देवशयनी एकादशी. यंदा हा सोहळा 20 जुलै दिवशी महाराष्ट्रात रंगणार आहे. विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनाला या दिवशी वारकरी मंडळी पायी वारी करत देशाच्या काना-कोपर्‍यातून पंढरपुरात दाखल होतात पण यंदा देखील कोरोना संकटामुळे आषाढी एकादशीचं स्वरूप बदललं आहे. पायी वारी न करता यंदा मोजकेच वारकरी बस ने पंढरपुरात दाखल झाले आहेत तर राज्यातील विठूमाऊलीची मंदिरं देखील भाविकांशिवाय आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) साजरी करणार आहेत. पण या आषाढीला विठ्ठल- रूक्मिणीचे भक्त आणि देवामध्ये असा दुरावा असला तरीही मनाने सारे विठू माऊलीचा गजर करत पंढरीतच असणार आहेत मग हे अंतर यंदा देखील सोशल मीडीयाच्या माध्यमातून भरू काढता येऊ शकतं. विठू माऊलीच्या भक्तांना यंदा देवशयनीच्या शुभेच्छा आणि आषाढी एकादशीच्या शुभेच्छा मराठमोळे मेसेजेस, Wishes, Quotes, HD Images, Greetings, संतवाणी ही Facebook, Twitter, Instagram,WhatsApp Status द्वारा शेअर करून द्विगुणित करूया.

आषाढी एकादशीच्या दिवशी विठू माऊलीचे भक्त विठू नामाचा गजर करतात. दिवसभर उपवास करतात. आषाढ शुक्ल एकादशी पासूनच महाराष्ट्रात अनेक वारकरी मंडळी चातुर्मासाची सुरूवात म्हणून पुढील चार महिने कांदा- लसूण यांचा आहारातून त्याग करतात. कार्तिकी एकादशी पर्यंत हे व्रत पाळले जाते. यंदा देखील वारी चुकल्याचं शल्य अनेक वारकर्‍यांच्या मनात आहे. पण कोरोना विरुद्ध लढण्यासाठी कराव्या लागलेल्या या तडजोडीमधून नव्या पद्धतीने साजर्‍या होणार्‍या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजणांना देऊन हा सण साजरा करा. Ashadhi Ekadashi 2021 Messages: आषाढी एकादशी निमित्त मराठी मेसेज, Quotes, WhatsApp Status, Wishes, HD Photos पाठवून साजरा करा विठुरायाचा गजर.

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

Ashadhi Ekadashi | File Image

हेचि दान देगा देवा

तुझा विसर न व्हावा

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi Ekadashi | File Image

विठ्ठल माझा ध्यास

विठ्ठल माझा श्वास

विठ्ठल माझा भास

विठ्ठल माझा आभास

सार्‍या विठू भक्तांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!

Ashadhi Ekadashi | File Image

चंद्र भागेच्या तीरी

उभा मंदिरी

तो पहा विटेवरी

विठ्ठल विठ्ठल जय हरी!

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

Ashadhi Ekadashi | File Image

सर्व विठू माऊलींच्या भक्तांना देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi Ekadashi | File Image

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

Ashadhi Ekadashi | File Image

 

अवघा रंग एक झाला

रंगी रंगला श्रीरंग ।

मी- तू पण गेले वाया

पाहता  पंढरीच्या राया ॥

विठ्ठल-रूक्मिणीच्या भक्तांना

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देणारी व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स

व्हॉट्सअ‍ॅप या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपवर देखील विविध सणांनुसार, आता व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स उपलब्ध आहेत. यंदा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही ही स्टिकर्स गूगल प्ले स्टोअर्सच्या माध्यमातून शेअर करू शकता.

 विठू माऊलीच्या भक्तांसाठी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी हे दोन दिवस मोठे आनंदाचे असतात. देवशयनीला झोप निद्रावस्थेत जातात तर कार्तिकी म्हणजे देवउठनी एकादशीला देव पुन्हा जागे होतात आणि पुन्हा शुभ कार्याला सुरूवात करतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif