Ashadhi Ekadashi 2020 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages, Images शेअर करून विठूभक्तांना द्या देवशयनी एकादशीच्या शुभेच्छा

Devshayani Ashadhi Ekadashi 2020 | FIle Photo

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi: आषाढ शुक्ल एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) . महाराष्ट्रात आषाढी एकादशी दिवशी राज्याचं आराद्ध दैवत विठ्ठल रूक्मिणीचं (Vitthal Rukmini) दर्शन घेतलं जात आहे. ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार, हा सण यंदा 1 जुलै दिवशी साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्राची मागील 100 पेक्षा अधिक दिवसांपासून सुरू असलेली कोरोना व्हायरस विरूद्धची लढाई आजही कायम आहे. अशामध्ये सार्वजनिक स्वरूपात, जल्लोषात आषाढी एकादशी साजरी केली जाणार नाही. पण यंदा तुम्ही विठूरायाकडे जाऊ शकत नसला तरीही भगवान विठ्ठल आणि रूक्मिणी मातेचा आर्शिर्वाद तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, मित्रपरिवाराला आणि प्रियजनांना व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), फेसबूक (Facebook) स्टेट्स, मेसेंजर, व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स (WhatsApp Stickers) यांच्यामाध्यमातून शेअर करू शकता. आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी शुभेच्छा (Devshayani Ekadashi) आज जगभर विखुरलेल्या त्याच्या भक्तांपर्यंत पोहचवण्यासाठी यंदा आम्ही तुमच्या साठी बनवलेली ही खास मराठमोळी ग्रिटिंग्स, वॉलपेपर्स, विठू माऊलीचे इमेजेस यासोबतच आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देणारे मेसेसेज, SMS, Wishes, Greetings डाऊनलोड करून, शेअर करून देखील देऊ शकता. Ashadhi Ekadashi 2020: आषाढी एकादशी 2020 मध्ये कधी आहे? जाणून घ्या व्रत, शुभ मुहूर्त वेळ आणि चातुर्मासाचा काळ

महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे व्रत पंढरपुरच्या वारीमुळे उत्सवाचे रूप घेऊन येते. मात्र यंदा संतांच्या पादुका एसटीने पंढरीमध्ये दाखल झाल्या आहेत. आषाढ शुक्ल एकादशीपासूनच चातुर्मासाचा प्रारंभ होतो. अनेक जण एकादशीचे व्रत एकदिवसीय पाळून विठ्ठल -रूक्मिणीकडे प्रार्थना करतात. मग अशा या मंगलमय दिवसाचा आनंद तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत शेअर करून त्यांना देवशयनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा द्या.

देवशयनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Wishes | File Photo

विठु माऊली तू माऊली जगाची

माऊलीत मूर्ति विठ्ठलाची...

विठू माऊलीच्या भक्तांना

आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!

Ashadhi Ekadashi Wishes | File Photo

हात कटावरी अन पाय विटेवरी

मिटलेले डोळे तरी हास्य मुखावरी

असा तो पांडुरंग  युगान युगे उभा गाभारी

नीलवर्ण प्रभा दिसे पसरली सभोवारी

विठूभक्तांना आषाढी एकादशीच्या

हार्दिक  शुभेच्छा!

Ashadhi Ekadashi Wishes | File Photo

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

कर कटावरी ठेवोनिया

देवशयनी आषाढी एकादशीच्या

हार्दिक शुभेच्छा!

Ashadhi Ekadashi Wishes | File Photo

सावळे सुंदर रूप मनोहर ।

राहो निरंतर हृदयी माझे ।।

आणिक काही इच्छा आम्हां नाही चाड ।

तुझे नाम गोड पांडुरंग ।।

Ashadhi Ekadashi Wishes | File Photo

जो ना भंगे तो अभंग

जो चित्ती राही तोचि रंग

या दोघांसी घेऊनी उभा राही

असा  माझा पांडुरंग

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छ!

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देणारी व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स

व्हॉट्सअ‍ॅप या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपवर देखील विविध सणांनुसार, आता व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स उपलब्ध आहेत. यंदा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही ही स्टिकर्स गूगल प्ले स्टोअर्सच्या माध्यमातून शेअर करू शकता.

पंढरपुरामध्ये यंदा केवळ मुख्यमंंत्र्यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा होणार आहे . यावेळेस कुणीही सामान्य वारकरी विठ्ठल-रूक्मिणीच्या गाभार्‍यात प्रवेश करणार नाही. त्यामुळे यंदाच्या आषाढीला विठ्ठलाकडे कोरोना संकटाचं सावट लवकरात लवकर दूर होवो अशी प्रार्थना समस्त भक्त मंडळी करणार आहे. दरम्यान ही आषाढी एकादशी तुम्हांलाही निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना!