Ashadhi Ekadashi 2020 Mahapuja: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सपत्नीक विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; विठ्ठल बडे ठरले मानाचे वारकरी

यावेळेस मंदिरातील वीणेकरी विठ्ठल बडे आणि त्यांच्या पत्नी अनुसया बडे यांना पूजेचा मान मिळाला.

Ashadhi Ekadashi 2020 Mahapuja| Photo Credits: Twitter/ CMO Maharashtra

आज आषाढ शुक्ल एकादशी (Ashadhi Ekadashi) म्हणजेच देवशयनी आषाढी एकादशी चा मंगलमय दिवस. विठ्ठल रूक्मिणीच्या पंढरीमध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सपत्निक शासकीय महापुजा केली. यावेळेस पंढरपुरच्या विठू माऊली आणि रखुमाईच्या मंदिरातील वीणेकरी विठ्ठल बडे, अनुसया बढे यांना मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजेमध्ये सहभागी होण्याचा मान मिळाला. यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवघ्या जगाला कोरोनाच्या विळख्यातून लवकरात लवकर मुक्त कर असं साकडं विठूरायाच्या चरणी घातलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यंदा शासकीय महापुजेमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि मुलगा व आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) देखील उपस्थित होते. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे देखील उपस्थित होते.  Ashadhi Ekadashi 2020 Vitthal Rukmini Live Darshan: आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणीचं इथे घ्या थेट दर्शन!

आषाढी दिवशी पहाटे 2.30 च्या सुमारास विठ्ठल- रूक्मिणी यांच्या पूजा-अर्चना आणि धार्मिक विधींना सुरूवात झाली. दरम्यान यंदा सामान्य वारकर्‍यांना मंदिरामध्ये दर्शनास मुभा नसल्याने मानाचा वारकरी म्हणून मंदिरात पाहरा देणार्‍यांमधून चिठ्ठीद्वारा एकाची निवड करण्यात आली त्यामध्ये वीणेकरी असणार्‍या विठ्ठल बडे यांची निवड झाली. विठ्ठ्ल बडे 84 वर्षीय असून अहमदनगरच्या पाथर्डी येथे त्यांचे मूळ गाव आहे. मागील 5 वर्षांपासून ते मंदिरात पाहरा देत वीणा वाजवत आहेत. Ashadhi Ekadashi 2020 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages, Images शेअर करून विठूभक्तांना द्या देवशयनी एकादशीच्या शुभेच्छा.

विठ्ठल - रूक्मिणीला आषाढी एकादशी दिवशी साकडं 

दरम्यान यंदा कोरोना संकटामुळे वारकर्‍यांची पायी वारी रद्द करण्यात आली. त्याऐवजी संतांच्या मानाच्या पालख्या आणि संत ज्ञानोबा, तुकोबा रायांच्या पादुका एसटी बसने पंढरपुरात दाखल झाल्या. सोशल डिस्टन्सिंग पाळून पुरेशी खबरदारी घेत मोजक्याच वारकर्‍यांच्या उपस्थितीमध्ये यंदा आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला आहे. भाविकांना मंदिर परिसरात तसेच चंद्रभागेच्या घाटावर गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंढरपूर सह नजिकच्या परिसरात उद्या 2 जुलै पर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.