Vat Purnima 2025 Mehndi Designs: वट पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या हातावर काढा 'या' खास मेहंदी डिझाईन्स

या शुभ प्रसंगी, तुम्ही तुमच्या पतीच्या नावाची मेहंदी तुमच्या हातावर लावून तुमच्या सौंदर्यात भर घालू शकता. म्हणूनचं आम्ही तुमच्यासाठी वट पौर्णिमेसाठी खास सुंदर मेहंदी डिझाइन घेऊन आलो आहोत. तुम्ही या डिझाईन्स आपल्या हातावर काढू शकता.

Vat Purnima 2025 Mehndi Designs (फोटो सौजन्य - File Image)

Vat Purnima 2025 Mehndi Designs: भारतात राहणाऱ्या विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वर्षभरात अनेक व्रते पाळतात, त्यापैकी एक म्हणजे वट सावित्री व्रत, जे वर्षातून दोनदा पाळले जाते. पहिल्यांदाच, महिला ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी निर्जल उपवास करतात, ज्याला वट सावित्री व्रत म्हणतात आणि दुसऱ्यांदा, ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी निर्जल उपवास करतात, ज्याला वट पौर्णिमा व्रत म्हणतात. या दोन्ही प्रसंगी, विवाहित महिला उपवास करतात, सोळा शृंगार करतात. तसेच विधीपूर्वक वट वृक्षाची पूजा करतात. पूजेदरम्यान, सावित्री आणि सत्यवानची कथा ऐकवली जाते, तसेच महिला वट वृक्षाभोवती दोरा गुंडाळतात आणि त्याची प्रदक्षिणा करतात. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी कामना करतात. यावर्षी, वट पौर्णिमेचा सण 10 जून 2025 रोजी साजरा केला जात आहे.

वट पौर्णिमेच्या दिवशी, महिला साज-शृंगार करतात. तसेच त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी महिला त्यांच्या हातावर मेहंदी लावतात. कारण मेहंदी शुभतेचे प्रतीक आणि सोळा अलंकारांपैकी एक मानली जाते. म्हणून, या शुभ प्रसंगी, तुम्ही तुमच्या पतीच्या नावाची मेहंदी तुमच्या हातावर लावून तुमच्या सौंदर्यात भर घालू शकता. म्हणूनचं आम्ही तुमच्यासाठी वट पौर्णिमेसाठी खास सुंदर मेहंदी डिझाइन घेऊन आलो आहोत. तुम्ही या डिझाईन्स आपल्या हातावर काढू शकता.

वट पौर्णिमेसाठी मेहंदी डिझाइन

वट पौर्णिमेसाठी सुंदर मेहंदी डिझाइन

वट पौर्णिमेसाठी सोपी आणि सुंदर मेहंदी डिझाइन 

वट पौर्णिमेसाठी सुंदर मेहंदी डिझाइन

वट पौर्णिमेसाठी खास मेहंदी डिझाइन

वट पौर्णिमेसाठी खास पारंपारिक मेहंदी डिझाइन

पौराणिक कथेनुसार, वट पौर्णिच्या दिवशी सावित्रीने यमराजाकडून तिचा पती सत्यवानचे जीव परत आणला, म्हणून हा अखंड सौभाग्याचा सण मानला जातो. यासोबतच, जेव्हा सत्यवान जंगलात बेशुद्ध पडला तेव्हा सावित्रीने त्याला वडाच्या झाडाखाली झोपवले, नंतर बांबूच्या पंख्याने त्याला पंखा लावून थंडावा दिला. त्याच परंपरेचे स्मरण करून, महिला या दिवशी वडाच्या झाडाला व्रत करतात आणि नंतर त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement