Angarki Sankashti Chaturthi 2022 HD Images: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारा शेअर करत करा आजच्या दिवसाची मंगलमय दिवस
चैत्र वद्य अंगारक चतुर्थीची सुरूवात मंगळवार, 19 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 4 वाजून 39 मिनिटांनी होणार आहे तर चैत्र वद्य अंगारक चतुर्थीची समाप्ती बुधवार, 20 एप्रिल 2022 दिवशी दुपारी 1 वाजून 53 मिनिटांनी होणार आहे.
गणरायाच्या व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचं (Sankashti Chaturthi) व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. त्यातही संकष्टीला मंगळवार आल्यास हा योगायोग अंगारकी संकष्टी चतुर्थी (Angarki Sankashti Chaturthi) होतो. यंदा अशीच अंगारकी संकष्टी चतुर्थी 19 एप्रिल 2022 दिवशी आहे. संकष्टी आणि अंगारक योग वर्षात क्वचितच येत असल्याने गणेशभक्तांमध्ये या दिवशी विशेष स्वरूपात गणपती बाप्पाची पूजा-अर्चना केली जाते. मंदिरात जाऊन आणि घरगुती स्वरूपातही भक्त मंडळी मोठ्या जल्लोषात पण तरीही भक्तिमय वातावरणामध्ये हा दिवस साजरा करतात. मग आजच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, प्रियजणांना देण्यासाठी ही खास मराठमोळी शुभेच्छापत्रं, ग्रीटिंग्स,Wishes, Messages, HD Images सोशल मीडीयामध्ये WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करा.
गणरायाचे भक्त अंगारकी निमित्त बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये गर्दी करतात. काही भक्तमंडळी या निमित्ताने उपवास करतात. संध्याकाळी चंद्रोदयानंतर बाप्पाची आरती करून, नैवेद्य दाखवून दिवसभराचं व्रत संपवतात. हे देखील नक्की वाचा: Angarki Sankashti Chaturthi 2022 Date and Time: अंगारकी संकष्टी चतुर्थीची तिथी आणि महत्त्व, जाणून घ्या .
अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा
चैत्र वद्य अंगारक चतुर्थीची सुरूवात मंगळवार, 19 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 4 वाजून 39 मिनिटांनी होणार आहे तर चैत्र वद्य अंगारक चतुर्थीची समाप्ती बुधवार, 20 एप्रिल 2022 दिवशी दुपारी 1 वाजून 53 मिनिटांनी होणार आहे.
सकाळी बाप्पाच्या पूजेमध्ये जास्वंदाचं फूल, दुर्वा अर्पण केल्या जातात. रीतीनुसार पूजा केल्यानंतर अनेकजण नैवेद्याला मोदक करतात. महाराष्ट्रात विविध प्रांतानुसार मोदक हे उकडीचे, तळणीचे केले जातात. या दिवशी पूजा करताना अथर्वशीर्ष, गणेशस्त्रोत्र यांचं पठण केले जाते.