IPL Auction 2025 Live

Angarki Chaturthi Special Songs: अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त गणपतीची 'ही' गाणी ऐकून व्हा भक्तीमय वातावरणात तल्लीन

परंतु शुल्क पक्षात येणाऱ्या चतुर्थीचे फार मोठे महत्व असून त्याला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणून संबोधले जाते.

Shree Siddhivinayak Ganpati (PC - Facebook)

Angarki Chaturthi Special Songs: प्रत्येक महिन्यात दोन गणेशाच्या दोन चतुर्थी असतात. परंतु शुल्क पक्षात येणाऱ्या चतुर्थीचे फार मोठे महत्व असून त्याला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणून संबोधले जाते. फाल्गुन महिन्यातील म्हणजेच आज असणारी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून सर्वत्र साजरी केली जाणार आहे. मंगळावारी येणाऱ्या या चतुर्थीमुळे त्याला अंगारकी चतुर्थी म्हटले जाते.(Angarki Chaturthi 2021: अंगारकी चतुर्थीदिवशी मुंबईमधील सिद्धिविनायकाचे ऑफलाईन दर्शन बंद; ऑनलाईन दर्शनाची सोय)

आराध्यदैवत मानल्या जाणाऱ्या गणपतीची आज मोठ्या भक्तीभावाने पूजा अर्चना केली जाते. तसेच गणपतीला नैवद्य दाखवून आपल्या मनातील इच्छा त्याच्या पुढे भाविक व्यक्त करतात. तसेच अंगारकी चतुर्थी निमित्त भजन कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन केले जाते. मात्र यंदाच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे ते रद्द करण्यात आले आहेत. त्याचसोबत भाविकांना सुद्धा वर्च्युअली दर्शन दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र तुम्ही नाराज होऊ नका कारण अंगारकी चतुर्थी निमित्त गणपतीची ही गाणी ऐकून त्याच्या भक्तीमय वातावरणात तुम्ही तल्लीन होऊ शकता.(Angarki Special Modak Recipes: अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त मोदक पीठाऐवजी थेट तांदूळ, रवा वापरून कशी बनवाल लुसलुशीत उकड Watch Video)

-तुझ मागतो मी आता 

-प्रथम तुला वंदितो 

-ओंमकार स्वरुपा

-गजानना श्री गणराया

-ओंकार प्रधान रुप गणेशाचे

-अधिपती मोरया

तर हिंदू पुरणात गणेशाच्या संबंधित अध्यायानुसार, गणपतीचा अंगारकी नामक एक भक्त होता. ऋषी भारद्वाराज आणि माता पृथ्वीचा पुत्र अंगारकीने एके दिवशी गणेशाची आराधना सुरु केली. या तापसिने प्रसन्न होऊन श्रीगणेश त्यांच्यासमोर प्रकट झाले व सोबतच एक वर मागण्यास सांगितले. यावेळी अंगारकीने त्यांच्याकडे अशी मागणी केली की, मला तुमच्या नावाशी जोडले जायचे आहे. या मागणीनंतर श्रीगणेशाने अंगारकीला वरदान दिले, ज्यानुसार पुढील काळात जेव्हा जेव्हा चतुर्थी आणि मंगळवार हा योग्य जुळून येईल तेव्हा त्यास अंगारकी चतुर्थी म्ह्णून संबोधले जाईल.