Angarki Chaturthi 2021 Images: अंगारकी चतुर्थी निमित्त मराठी Wishes, Messages, WhatsApp Status शेअर करून गणेश भक्तांना द्या खास शुभेच्छा!
Angarki Chaturthi 2021 Images (PC - File Image)

Angarki Chaturthi 2021 Images: संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2021) म्हणजे संकटाचा पराभव करणारी चतुर्थी. या दिवशी जीवनातील सर्व संकट दूर करण्यासाठी श्री गणेशाची पूजा केली जाते. आज सर्वत्र अंगारकी चतुर्थीच्या वर्ताचे पालन करण्यात येत आहे. प्रत्येक महिन्यात दोनदा गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) साजऱ्या केल्या जातात. पूर्णिमा नंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आणि अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. ही चतुर्थी मंगळवारी पडल्यास त्याला अंगारकी चतुर्थी (Angarki Chaturthi) असे म्हणतात.

संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येत असली तरी फागुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचे सर्वात जास्त महत्त्व आहे. अंगारकी चतुर्थीला द्विजप्रिय संकष्टी असंही म्हटलं जात. आजच्या दिवशी सर्व गणेशभक्त मनोभावे बाप्पाची पूजा करून उपवास करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही अंगारकी चतुर्थी निमित्त मराठी Wishes, Messages, WhatsApp Status, Images शेअर करून गणेश भक्तांना खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेजेस नक्की उपयोगात येतील. (वाचा - Angarki Chaturthi 2021: अंगारकी चतुर्थी दिवशी दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद; भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय)

Angarki Chaturthi 2021 Images (PC - File Image)
Angarki Chaturthi 2021 Images (PC - File Image)
Angarki Chaturthi 2021 Images (PC - File Image)
Angarki Chaturthi 2021 Images (PC - File Image)
Angarki Chaturthi 2021 Images (PC - File Image)
Angarki Chaturthi 2021 Images (PC - File Image)

अंगारकी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास केला जातो. त्यानंतर रात्री भोजन केलं जातं. या दिवशी भोजनात समाविष्ट असलेल्या उकडीच्या मोदकांचा गणपतीला नैवेद्य दाखवतात. यावेळी श्रीगणेशाची पूजाही करतात.