Anganewadi Jatra 2021 Date: प्रसिद्ध आंगणेवाडी श्री भराडीदेवीची यात्रा 6 मार्च 2021 ला होणार
त्यामुळे दरवर्षी भरणार्या या देवीच्या दीड दिवसांच्या यात्रेला मुंबई, पुणे शहरातून मोठ्या प्रमाणात चाकरमणी कोकणात दाखल होतात. मात्र यंदा सगळीकडे सावट पसरलेले आहे.त्यामुळे यंदा हा वार्षिकोत्सव मर्यादित स्वरुपाचा होणार असून यावेळी फक्त आंगणेकुटुंबीय आंगणेवाडी यांच्या उपस्थितित पार पडेल.
Anganewadi Jatra 2021 Date: कोकणवासियांसाठी श्रद्धास्थान असलेल्या मालवणातील (Malvan) भराडी देवीची जत्रा (Bharadi Devi Jatra) वार्षिकोत्सव 6 मार्च 2021 रोजी साजरा होणार आहे.नवसाला पावणारी देवी अशी आंगणेवाडीतील या देवीची ख्याती देशा-परदेशात पसरली आहे. त्यामुळे दरवर्षी भरणार्या या देवीच्या दीड दिवसांच्या यात्रेला मुंबई, पुणे शहरातून मोठ्या प्रमाणात चाकरमणी कोकणात दाखल होतात. मात्र यंदा सगळीकडे कोरोनाचे सावट पसरलेले आहे.त्यामुळे यंदा हा वार्षिकोत्सव मर्यादित स्वरुपाचा होणार असून यावेळी फक्त आंगणेकुटुंबीय आंगणेवाडी यांच्या उपस्थितित पार पडेल अशी माहिती आंगणेकुटुंबीयांकडून देण्यात आलेली आहे.आंगणेवाडीची जत्रा ही मालवणातील केवळ आंगणे या गावातील असते. मात्र त्याची ख्याती सर्वदूर पसरली असल्याने आता मोठ्या प्रमाणात भाविक येतात. (Datta Jayanti 2020: आज साजरी होणार दत्त जयंती, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि कथा)
मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या भाविकांना या यात्रेत सहभागी होता येणार नाही त्यामुळे भविकांमध्ये नक्कीच नाराजी पसरेल.मात्र भाविकांच्या गैरसोईसाठी आंगणेकुटुंबीयांनी दिलगिरी व्यक्त केली असून आपण जय ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून भराडी देवीस आपले सांगणे सांगावे आणि तिथूनच नमस्कार करावा, आई भराडी माता तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल असे आवाहन ही आंगणे कुटुंबीयांकडून करण्यात आलेले आहे. (Akkalkot Swami Samarth Temple Closed for Devotees: अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर भाविकांसाठी 2 जानेवारीपर्यंत बंद, कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी निर्णय)
श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच सुरुवात होते.भाविकांना कमी वेळात दर्शन घेता यावे म्हणून आंगणे कुटुंबियांकडून विशेष सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करुन देत असते मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे मर्यादित लोकांमध्येच हा उत्सव पार पडणार आहे.