Anant Chaturdashi 2026 Wishes: अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत बाप्पाला द्या निरोप!
गणेशोत्सव हा केवळ पूजेचा नव्हे, तर कुटुंब आणि समाज एकत्र येण्याचा सण आहे. दहा दिवसांच्या सहवासानंतर बाप्पाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावतात. तरीही, "पुढच्या वर्षी लवकर या" या आशेने भाविक पुढील गणेशोत्सवाची वाट पाहू लागतात.
Anant Chaturdashi 2026 Marathi Wishes: गणपती बाप्पाची दहा, अकरा दिवस आराधना केल्यानंतर गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीने (Anant Chaturdashi) केली जाते. अनंत चतुर्दशी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला येते.घरगुती आणि अनेक सार्वजनिक मंडळाचे गणपती अनंत चतुर्दशीला भाविकांचा निरोप घेऊन पुढल्या वर्षी पुन्हा लवकर येण्याचं वचन येऊन जातात. यंदा बाप्पा बारा दिवसांच्या मुक्कामानंतर 25 सप्टेंबरला आपल्या गावी निघाले आहे. मग या दिवशी बाप्पाला निरोप देत तुमच्या परिवाराला, मित्रमंडळींना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes, Images मधून देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.
निर्मिती आणि विलय या चक्राचे प्रतीक म्हणूनही विसर्जनाकडे पाहिले जाते.अनंत चतुर्दशी हा भगवान विष्णूच्या 'अनंत' म्हणजे अंत नसलेल्या रूपाच्या पूजेचा दिवस आहे. अनेक भाविक या दिवशी व्रत करतात.अनंत सूत्र पूजेनंतर 14 गाठी असलेला पवित्र धागा, म्हणजेच अनंत सूत्र, हातावर बांधण्याची परंपरा आहे. पारंपरिक मान्यतेनुसार हे व्रत सलग 14 वर्षे केले जाते. नक्की वाचा: Ganesh Visarjan Slogans 2026: पुढच्या वर्षी लवकर या!' बाप्पाला निरोप देताना दुमदुमणार ही लोकप्रिय विसर्जन घोषवाक्ये.
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा





महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना दिले जाते. 1893 मध्ये पुण्यात या उत्सवाला सामाजिक चळवळीचे रूप मिळाले. आजही पुण्यातील मानाचे गणपती आणि विसर्जन मिरवणूक ही शहराची ओळख आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभर या दिवशी मोठ्या मिरवणुका निघतात.अलीकडच्या काळात पर्यावरणपूरक विसर्जनावर भर दिला जात आहे.
गणेशोत्सव हा केवळ पूजेचा नव्हे, तर कुटुंब आणि समाज एकत्र येण्याचा सण आहे. दहा दिवसांच्या सहवासानंतर बाप्पाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावतात. तरीही, "पुढच्या वर्षी लवकर या" या आशेने भाविक पुढील गणेशोत्सवाची वाट पाहू लागतात.
(The above story first appeared on LatestLY on Sep 25, 2026 08:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

