Happy Amebdkar Jayanti HD Images 2022: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून करा महामानवाला वंदन

आंबेडकर जयंती निमित्त नागरिक एकमेकांना शुभेच्छा देतात. आपणही सोशल मीडियाच्या माध्यामातून तसेच मेसेज, व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून आंबेडकर जयंती निमित्त एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता.

Happy Amebdkar Jayanti HD Images 2022: महामानव भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात आज (14 एप्रिल) धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. आंबेडकर अनुयायी आणि भारतीय राज्य घटनेचे पाईक असलेले नागरिक आज एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. याच दिवशी म्हणजेच 14 एप्रिल 1891 रोजी डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचा जन्म झाला. अत्यंत कष्टकरी आणि दलित कुटुंबात जन्मलेल्या आंबेडकर यांनी आपले अवघे आयुष्य समाजसुधारणेसाठी खर्च केले. आंबेडकर जयंती निमित्त नागरिक एकमेकांना शुभेच्छा देतात. आपणही सोशल मीडियाच्या माध्यामातून तसेच मेसेज, व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून आंबेडकर जयंती निमित्त एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता.

संपूर्ण देशभरात आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पाठीमागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे सर्वच सार्वजनिक उत्सवांवर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे सहाजिकच आंबेडकर जयंतीही घरीच साजरी केली जात असे. आता मात्र कोरोना संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. त्यामुळे आंबेडकर जयंती धुमधडाक्यात साजरी करता येणार आहे. प्रदीर्घ काळानंतर आंबेडकर जयंती मोकळेपणाने साजरी करता येणार असल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 

 

 

 

भारतातील जातीयता डॉ. आंबेडकर यांनी लहानपणापासूनच भोगले होते. त्यामुळे जातीयतेबद्दलची त्यांची मते पुढे अभ्यासानुसार अधिक व्याप्त होत गेली. त्यातून त्यांनी समाजपरिवर्तनाचे व्रत घेतले आणि दलितांना शिका आणि संघटीत व्हा असा संदेश दिला. पुढे त्यांनी हिंदू धर्माचाच त्याग करत बौद्ध धर्म स्वीकारला. मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, असा थेट निर्धार करत त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. 14 ऑक्टोंबर 1956 मध्ये नागपूरात त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. 6 डिसेंबर 1956 रोजी आंबेडकर त्यांचे दिल्ली येथे निधन झाले.