Ambedkar Jayanti 2020 Quotes: भीम जयंतीच्या निमित्त Whatsapp Status, Images मधून शेअर करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदी मधील थोर विचार!

बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार तुम्ही स्वतःच्या जीवनात लागू करून या महामानवाला खरी मानवंदना देऊ शकाल. हे विचार केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता तुमच्या मित्र मैत्रिणी, कुटुंबीय, नातेवाईक, प्रियजन सर्वांसोबत आपण Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करा.

Dr. Bhimrao Ambedkar | (Photo Credits: File Photo)

Inspirational Quotes Of Dr. BR Ambedkar: भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babsaheb Ambedkar) यांची आज 14 एप्रिल रोजी 129 वी जयंती आहे. दरवर्षी भीम जयंती (Bhim Jayanti) निमित्त लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी परिसरात दर्शनासाठी येतात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे मोठे उत्सव करता येणार नाहीयेत. मात्र तरीही हा दिवस खास बनवण्यासाठी एक मार्ग आम्ही आपल्याला सुचवणार आहोत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार तुम्ही स्वतःच्या जीवनात लागू करून या महामानवाला खरी मानवंदना देऊ शकाल. हे विचार केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता तुमच्या मित्र मैत्रिणी, कुटुंबीय, नातेवाईक, प्रियजन सर्वांसोबत आपण Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करा. तुमच्या मित्रपरिवारातील अमराठी सदस्यांपर्यंत सुद्धा हे विचार पोहचावेत यासाठी आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काही खास हिंदी मधील विचार घेऊन आलो आहोत. Ambedkar Jayanti 2020 Wishes: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठामोळे Messages, Wishes, Greetings शेअर करून साजरी करा यंदा भीम जयंती!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

Babasaheb Ambedkar Quotes In Hindi (Photo Credits: File Image)
Babasaheb Ambedkar Quotes In Hindi (Photo Credits: File Image)
Babasaheb Ambedkar Quotes In Hindi (Photo Credits: File Image)
Babasaheb Ambedkar Quotes In Hindi (Photo Credits: File Image)
Babasaheb Ambedkar Quotes In Hindi (Photo Credits: File Image)
Babasaheb Ambedkar Quotes In Hindi (Photo Credits: File Image)

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती द्यायची झाल्यास त्यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपली कर्तबगारी दाखवत आयुष्यभर दिन दलितांची आदर्श रित्या सेवा केली. 2017 सालपासून महाराष्ट्रामध्ये 14 एप्रिल हा दिवस ‘ज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या विचारांचा, शिकवणीचा वसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी त्यांनी आंबेडकर जयंती हा एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवसानिमित्त महामानव डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन !