Ahilyabai Holkar Jayanti 2025: अहिल्याबाई होळकर जयंतीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages च्या माध्यमातून देत व्यक्त करा आदरांजली

अहिल्याबाई होळकर यांनी समाजातील रूढीवादी नियमांविरुद्ध लढा दिला आणि एक कणखर व स्वावलंबी महिला शासक म्हणून आपली ओळख प्रस्थापित करण्यासाठी अनेक संघर्षांचा सामना केला.

Ahilyabai Holkar Jayanti 2025: अहिल्याबाई होळकर जयंतीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages च्या माध्यमातून देत व्यक्त करा आदरांजली
अहिल्याबाई होळकर जयंती

अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांची यंदा 300 वी जयंती साजरी केली जाणार आहे. 31 मे 1725 दिवशी त्यांचा जन्म महाराष्ट्रातील चौंडी मध्ये झाला होता. माळव्याच्या 'तत्त्वज्ञानी महाराणी' म्हणून आजही त्यांची ओळख आहे. अहिल्याबाई होळकर या माळवा प्रांताच्या जहागीरदार होत्या. पतीच्या पश्चात त्यांना सासरे मल्हारराव होळकर यांनी सती जाऊ न देता सैन्य, राज्यकारभार यांचं शिक्षण दिलं. मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर माळवा प्रांताचा कारभार त्या स्वत: सांभाळू लागल्या. अशा या कर्तबगार महाराणीच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मराठमोळी Greetings, WhatsApp Status, Facebook Messages, Quotes शेअर करत तुम्ही आदरांजली अर्पण करू शकता.

अहिल्याबाई होळकर यांनी समाजातील रूढीवादी नियमांविरुद्ध लढा दिला आणि एक कणखर व स्वावलंबी महिला शासक म्हणून आपली ओळख प्रस्थापित करण्यासाठी अनेक संघर्षांचा सामना केला. भारतामध्ये अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधण्यात, मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यामध्ये अहिल्याबाईंचा मोलाचा वाटा आहे. नक्की वाचा: अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल 5 खास गोष्टी.

अहिल्याबाई होळकर जयंती शुभेच्छा

अहिल्याबाई होळकर जयंती
अहिल्याबाई होळकर जयंती
अहिल्याबाई होळकर जयंती
अहिल्याबाई होळकर जयंती
अहिल्याबाई होळकर जयंती
अहिल्याबाई होळकर जयंती

 

70 व्या वर्षी अहिल्याबाई होळकर यांचे निधन झाले. अनेकांनी त्यांच्या मृत्यूपश्चात अहिल्याबाईंना संताचा दर्जा देण्यात आला.अहिल्यादेवींनी त्यांच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून स्वत:च्या घरापासून सुधारणेला सुरूवात केली. अहिल्यादेवींनी हुंडाविरोधी कायदा करून हुंडा देणाऱ्या, घेणार्‍या व मध्यस्थी करणाऱ्यांना दंड ठोठावला होता.

(The above story first appeared on LatestLY on May 30, 2025 04:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).