Ahilyabai Holkar Jayanti 2022 Images: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त WhatsApp Status, Greetings शेअर करत त्यांना करा अभिवादन!
सार्यांना समान न्याय मिळेल यासाठी त्या विशेष लक्ष देत होत्या.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांची यंदा 297 वी जयंती साजरी केली जात आहे. कुशाल प्रशासक असलेल्या अहिल्याबाईंचा जन्म जन्म 31 मे 1725 महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. वयाच्या 8व्या वर्षी मल्हारराव होळकर यांच्या मुलासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात आलेल्या विविध टप्प्यांनी त्यांच्या जीवनाला वळण दिले. आज अहिल्याबाईंच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतीला वंदन करून या कर्तबगार स्त्री बाबत समाजमाध्यमांत जनजागृती करण्यासाठी काही शुभेच्छापत्रं, HD Images, Wallpapers तुम्ही शेअर करू शकता. त्यासाठी लेटेस्टली मराठी कडून तयार केलेले हे खास फोटोज तुम्ही शेअर करू शकता. हे देखील नक्की वाचा: वयाच्या 8व्या वर्षी होळकरांची सून ते 'तत्त्वज्ञानी राणी' पहा अहिल्याबाईंचा हा प्रेरणादायी प्रवास कसा होता?
अहिल्याबाई होळकर जयंतीच्या शुभेच्छा
अहिल्याबाई न्यायदानासाठी विशेष ओळखल्या जातात. सार्यांना समान न्याय मिळेल यासाठी त्या विशेष लक्ष देत होत्या. एकदा संस्थानचा सुभेदार तुकोजी होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणून त्यालाही तुरुंगात डांबण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नव्हते. अहिल्याबाईंचे राज्य हे कायद्याचे राज्य होते त्यामुळे जनता समधानी होती. कदाचित म्हणून पुढे त्यांना संताच्या दर्जाप्रमाणे पुजलं जाऊ लागलं. अनेक अनिष्ट प्रथा, परंपरांना विरोध करत त्यांनी नवनिर्माण केले होते.