Wedding Special Mangalsutra Designs: मराठी व हिंदी सिनेसृष्टीत तसेच मालिकांमधील लाडक्या अभिनेत्रींनी वापरलेल्या मंगळसूत्रांच्या 'या' डिझाइन्स नव्या नवरी साठी आहेत बेस्ट पर्याय

सध्या अनेक टीव्हीवरील अनेक मालिका तसेच अभिनेत्रींमुळे मंगळसूत्रांचा ट्रेंड देखील बदलत चालला आहे. कामावर जाणा-या मुली शक्यतो गळ्याला शोभेल असे छोटे मंगळसूत्र घालणेच पसंत करतात.

Mangalsutra Design (Photo Credits: File)

Wedding Special 2019: डिसेंबर महिना म्हणजे लग्नसराईचा महिना. तुळशीची लग्न झाली की शुभमुहूर्तांना सुरुवात होते. लग्नाच्या खरेदीमध्ये नव्या नवरीसाठी सर्वात अमूल्य दागिना असतो तो म्हणजे तिचे मंगळसूत्र. लग्नाचे अनेक स्वप्न रंगवणारी तरुणीचे तिचे मंगळसूत्र कसे असावे याकडे खूप लक्ष देते. पूर्वीच्या काळी लग्नाचे सर्व दागिने ही घरातील मोठी मंडळीचं करायचे. पण जसजसा काळ बदलत गेला तसतसे मोठ्या मंडळींनीही आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत आणि आपल्या मुलांना त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे त्यांच्या आयुष्यातील अनमोल सोहळ्याची खरेदी करता यावी म्हणून एक पाऊल मागे घेतले. त्यामुळे वधू-वर स्वत: आपल्या लग्नाची खरेदी किंवा लग्नाबाबत अन्य गोष्टींची तयारी स्वत: करताना दिसतात. त्यांच्यासाठी या सर्व गोष्टी खूपच स्पेशल असतात.

या खरेदीमध्ये मंगळसूत्र हा सर्वात महत्वाचा विषय आहे. सध्या अनेक टीव्हीवरील अनेक मालिका तसेच अभिनेत्रींमुळे मंगळसूत्रांचा ट्रेंड देखील बदलत चालला आहे. कामावर जाणा-या मुली शक्यतो गळ्याला शोभेल असे छोटे मंगळसूत्र घालणेच पसंत करतात.

चला तर मग पाहूया मंगळसूत्रांचे ट्रेंड्स

1. 'तुला पाहते रे' या मालिकेमधील इशाचे मंगळसूत्र

Isha Mangalsutra Design (Photo Credits: File)

2. 'होणार सून मी या घरची' मधील जान्हवी चे मंगळसूत्र

Janhavi Mangalsutra Design (Photo Credits: File)

3. 'सरस्वती' मालिकेमधील सरस्वतीचे मंगळसूत्र

Saraswati Mangalsutra Design (Photo Credits: File)

4. अभिनेत्री सोनम कपूरचे मंगळसूत्र

Sonam Kapoor Mangalsutra Design (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- Pre-Wedding Shoot Spots In Mumbai: प्री वेडिंग फोटो शूट करणार आहात? मुंबईतील 'या' पाच ठिकाणांचा पर्याय ठरेल अगदी बेस्ट

5. दीपिका पादुकोण चे मंगळसूत्र

Deepika Padukone Mangalsutra Design (Photo Credits: Yogen shah)

6. प्रियंका चोपड़ा चे मंगळसूत्र

Priyanka Chopra Mangalsutra Design (Photo Credits: File)

मंगळसूत्र खरेदी करताना मुलींच्या मनात बरीच घालमेल सुरु असते. त्याच्या डिझाईन्सपासून त्याचे मणी, हिरे कसे असावेत या सर्वाबाबत अनेक कल्पना असतात. अशावेळी जर तुम्हाला तुमच्या आवडीच्या अत्रिनेत्रींसारखे मंगळसूत्र करायचे असेल तर या आयडियाज तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.