New York Times' Most Stylish People: न्यूयॉर्क टाइम्सच्या 2024 मधील सर्वात स्टायलिश व्यक्तींच्या यादीत Radhika Merchant आणि Anant Ambani यांचा समावेश
अनंत आणि राधिकाचे लग्न वर्षातील सर्वात शाही लग्न ठरले. या दोघांच्या लग्नाचे विधी अनेक महिने चालले. या खास लग्नासाठी देशातीलच नव्हे तर परदेशातूनही अनेक सेलिब्रिटी भारतात आले होते.
New York Times' Most Stylish People: अंबानी कुटुंबासाठी हे वर्ष खूप संस्मरणीय ठरले. यावर्षी जुलै महिन्यात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याने त्याची बालपणीची प्रेयसी राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नगाठ बांधली. राधिका मर्चंट ही वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे, जे एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आणि उपाध्यक्ष आहेत. राधिका ही प्रशिक्षित भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहे आणि तिला भरतनाट्यममध्ये प्राविण्य आहे. आता अनंत अंबानी आणि राधिका यांचा 2024 च्या न्यूयॉर्क टाइम मोस्ट स्टायलिश लोकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत अनेक बड्या व्यक्तींच्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे.
अनंत आणि राधिकाचे लग्न वर्षातील सर्वात शाही लग्न ठरले. या दोघांच्या लग्नाचे विधी अनेक महिने चालले. या खास लग्नासाठी देशातीलच नव्हे तर परदेशातूनही अनेक सेलिब्रिटी भारतात आले होते. नुकतेच 5 डिसेंबर रोजी, न्यूयॉर्क टाइम्सने 2024 मधील 63 सर्वात स्टाइलिश लोकांची प्रतिष्ठित यादी जारी केली, ज्यामध्ये राधिका-अनंत यांनी स्थान मिळवले आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे की, ‘रेड कार्पेटपासून ते रिहानाच्या ग्लॅमरपर्यंत, अनंत आणि राधिकाच्या लग्नात सर्व काही होते. या लग्नाने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले.’ राधिका-अनंत व्यतिरिक्त, न्यूयॉर्क टाइम्सच्या 2024 च्या मोस्ट स्टायलिश लोकांच्या यादीत बियॉन्से, झेंडाया, ॲडेले, चार्ली एक्ससीएक्स, निकोला कॉफ्लन, कोलमन डोमिंगो, डॅनियल क्रेग, डेमी मूर, दक्षिण कोरियाचा शार्पशूटर किम येजी, हसन मिन्हाज, चॅपेल रोन, सिंथिया एरिवो, एरियाना ग्रांडे सारख्या सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे. (हेही वाचा: Rs 1 Lakh Stipend For Skincare: स्किनकेअरसाठी मिळणार 1 लाख रुपये स्टायपेंड; भारतीय स्टार्टअप Deconstruct ने सुरु केला नवीन इंटर्नशिप कार्यक्रम, जाणून घ्या सविस्तर)
दरम्यान, या वर्षी यूट्यूबवर अनंत-राधिकाच्या लग्नाने सगळे रेकॉर्ड मोडले. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ यूट्यूबवर सुमारे 6.5 अब्ज लोकांनी पाहिला. अनंत आणि राधिकाच्या लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हजेरी लावली होती. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झालेल्या एका शानदार सोहळ्यात अनंत-राधिका सप्तपदी चालले. अहवालानुसार, अंबानी कुटुंबाने पाठवलेल्या लग्नपत्रिकेची किंमत 7 लाख रुपये होती. तसेच म्हटले जात आहे की, या लग्नावर जवळपास 5,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)