Miss India Runner Up दीक्षा सिंह हिचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव, जनतेने नाकारले राजकीय 'मॉडेल'
मॉडेल दीक्षा सिंह जिल्हा परिषद निवडणूक मैदानात उतरली होती. या निवडणुकीत ती पहिला क्रमांक तर सोडाच पहिल्या तिन क्रमांकातही आली नाही. तिला थेट पाचव्या क्रमांकाची मते मिळाली. मिस फेमिना रनर अप राहिलेली दीक्षा बक्शा येथील वॉर्ड क्रमांक 26 मधून नशिब आजमावत होती.
निवडणुकीत तुम्ही एकदा का उमेदवारी जाहीर केली की मग तुम्ही कोणीही असा. मतदार राजा असलेली जनताच तुमचे भवितव्य ठरवणार. जर जनतेच्या मनात आले तर जनता रावाचाही रंक करते आणि रंकाचाही राव. त्यामुळे जनइच्छेपुढे तुमचे पद, मान, सन्मान प्रतिष्ठा काही चालत नसते. म्हणूनच कोणीतरी म्हटले आहे 'गाव करील ते राव काय करील'. उत्तर प्रदेश राज्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणूक 2021 (Zilla Panchayat Elections 2021) मध्ये असेच काहीसे पाहायला मिळाले. उत्तर प्रदेश पंचायत निवडणूक 2021 मध्ये दीक्षा सिंह (Diksha Singh) हिचा पराभव झाला. दीक्षा सिंह हे साधे व्यक्तीमत्व नव्हते. ती एक प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडया रनरअप (Miss India Runner Up ) आहे. मीस इंडिया रनरअप दीक्षा सिंह (Miss India Runner Up Diksha Singh) हिच्या पराभवाच्या चर्चा आता उत्तर प्रदेश आणि सोशल मीडियावरही सुरु आहेत. इतका प्रसिद्ध चेहरा जनतेने नाकारला कसा? हा प्रश्न अनेकांसाठी एक उत्सुकता बनून राहिला आहे.
मॉडेल दीक्षा सिंह जिल्हा परिषद निवडणूक मैदानात उतरली होती. या निवडणुकीत ती पहिला क्रमांक तर सोडाच पहिल्या तिन क्रमांकातही आली नाही. तिला थेट पाचव्या क्रमांकाची मते मिळाली. मिस फेमिना रनर अप राहिलेली दीक्षा बक्शा येथील वॉर्ड क्रमांक 26 मधून नशिब आजमावत होती. या मतदारसंघातून भाजप नेता स्वर्गीय राजमणी सिंह यांची भाजी नगीणा सिंह विजयी झाल्या. दीक्षा सिंह हिला केवळ 2000 मते मिळाली. तर 7000 मते मिळवत भाजपच्या नगीना सिंह विजयी झाल्या. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संजू यादव यांना 5000 मते मिळाली. (हेही वाचा, Femina Miss India 2020 Winner ठरली Manasa Varanasi; जाणून घ्या तिचं वय, शिक्षण आणि इतर माहिती)
दीक्षा सिंह हिच्या उमेदवारीमुळे प्रसारमाध्यमं आणि विविध वेबसाईट्सचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले होते. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण निवडणुकीत उतरल्याचे दीक्षा सिंह हिने सांगितले होते. दीक्षा हिने बॉलिवूड चित्रपटांसाठी लेखणही केले आहे. ‘इश्क तेरा’ हा त्यापैकीच एक. याशिवाय तिने पॅंटीन, पॅराशूट ऑईल, स्नॅपडील यांसारख्या काही उत्पादनांसाठी विविध जाहीरातींमध्ये काम केले आहे. लवकरच ती एका मोठ्या बॅनरसोबत एका वेबसीरीजमध्येही दिसणार असल्याची चर्चा आहे. तिचे वडील तिच्यासाठी निवडणूक प्रचार करत होते. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे महिला राखीव झाले. याच संधीचा फायदा घेत दीक्षा सिंह मैदानत उतरली होती.
दीक्षा सिंह हिने सांगितले की, गावात शेतकऱ्यांच्या समस्या आजही कायम आहेत. मुंबईती फिल्मी जगात राहून गावचा विकास शक्य नाही. त्यासाठी आपले घर साफ करण्यासाठी स्वत:च काम करायला हवे .त्यामुळे आपण इथे राहूनच काम करण्याचा निर्णय घेतला आणि निवडणूकीत उतरलो असे, ती सांगते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)