Mehendi Designs For Wedding: नवरी मुलीसाठी Bridal Designs सह आलेत कटवर्क, बांधणी, पोट्रेट सारखे मेहंदीचे भन्नाट ट्रेंड्स, जाणून घेऊयात मेहंदी आर्टिस्ट प्रीतम राणे यांच्याकडून
ब्रायडल मेहंदीमध्ये दुल्हा दुल्हनसह आता मेहंदीचे अनेक नवीन प्रकार आले. म्हणून लग्नसराईच्या निमित्ताने आम्ही बातचीत केली मेहंदी आर्टिस्ट सौ. प्रीतम राणे यांच्यासह आणि जाणून घेतल्या सध्याचे मेहंदीतील नवीन ट्रेंड्स:
लग्नातील नवरीची मेहंदी हा सर्वांसाठी चर्चेचा विषय असतो. पूर्वीच्या काळी मेहंदीमध्ये नव-याचे नाव शोधणे, मेहंदीला किती रंग चढलाय यावरून नव-याचे आपल्या होणा-या बायकोवर किती प्रेम आहे ते ठरायचे. हा प्रकार आजही ब-याच ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र सध्याच्या काळात लग्नसोहळाच मुलींसाठी एवढा जवळचा आहे की आपले कपडे, मेहंदी, मेकअप, चपला, हेअरस्टाईल हे सर्व त्यांच्या प्रतिष्ठेचा आणि जिव्हाळ्याचा विषय बनत चाललाय. त्यामुळे मेहंदी कशी असली पाहिजे इथपासून त्यात काय काय असले पाहिजे यासाठी त्या आग्रही असतात.
जसजसा ट्रेंड बदलत गेला तसतशा मेहंदीच्या डिझाईन्स मध्येही बदल होत गेले. ब्रायडल मेहंदीमध्ये दुल्हा दुल्हनसह आता मेहंदीचे अनेक नवीन प्रकार आले. म्हणून लग्नसराईच्या निमित्ताने आम्ही बातचीत केली मेहंदी आर्टिस्ट सौ. प्रीतम राणे यांच्यासह आणि जाणून घेतल्या सध्याचे मेहंदीतील नवीन ट्रेंड्स:
1. ब्रायडल मेहंदी:
यात साधारणपणे दुल्हा-दुल्हन, घोडे, हत्ती, अंबारी, पालखी (नवरीची डोली) यांसारखे डिझाईन्स काढली जातात.
2. कटवर्क:
हा प्रकार दिवसेंदिवस खूप लोकप्रिय होत चालला आहे. यात तुम्हाला पाने, फुले, कमळाला बाजूने एक वेगळाच आकार दिला जातो ज्यामुळे ही मेहंदी खूप भरगच्च वाटते आणि छान रंगते देखील.
3. बांधणी:
यामध्ये तुम्हाला बांधणीप्रमाणे चौकोन वापरून छान डिझाईन्स केलेले पाहायला मिळतील.
4. पोर्ट्रेट:
हा प्रकारही सध्या मेहंदीमध्ये लोकप्रिय होत आहे. मात्र हे डिझाईन्स काढणे खूप अवघड असल्याने काही ठराविक मेहंदी आर्टिस्ट अशा पद्धतीची मेहंदी काढतात.
हेदेखील वाचा- Winter Wedding Fashion Tips: थंडीच्या सीझन मधील लग्नासाठी Warm & Stylish लूक साकारायला मदत करतील 'या' फॅशन टिप्स
5. अरेबिक मेहंदी:
हा आधीपासून प्रचलित असलेला मेहंदीचा प्रकार असला तरीही यात ब-याच आकर्षक डिझाईन्स पाहायला मिळतील.
नक्षीदार मेहंदीने रंगलेला नवरीचा हात हा खूपच सुंदर दिसतो किंबहुना तो सर्वांच्या आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय बनतो. त्यामुळे ती मेहंदी डिझाईनही तितकी खास असावी असे वाटणे यात काही गैर नाही. नाही का? आमचा हा लेख कसा वाटला नक्की कळवा.