IPL Auction 2025 Live

Deepika Ranveer Wedding: तर असा साकारला दीपिका रणवीरचा वेडींग ड्रेस! (Videos)

व्हिडिओच्या माध्यमातून पाहा कसे साकारले गेले दीपवीर यांच्या विवाहाचे पोशाख...

दीपिका पदुकोण-रणवीर सिंग (Photo credit : Instagram)

Deepika Ranveer Wedding:  बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी अर्थात रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांचा विवाहसोहळा (Wedding) 14-15 नोव्हेंबरला इटलीतील कोमो लेक येथे संपन्न झाला. गेल्या वर्षभरापासून दीपवीरच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. दीपवीरचा लग्नसोहळा शाही असणार यात काहीच शंका नव्हती. पण दीपवीरचा लग्नातील लूक पाहण्यासाठी चाहते अत्यंत उत्सुक होते. मात्र दोन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर दीपवीरने अखेर लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर दीपिकाच्या चुनरीपासून दागिन्यांपर्यंत सगळ्याची चर्चा होऊ लागली. दीपिकाच्या पोशाखाला साजेसा असलेला रणवीरच्या लूकही चाहत्यांच्या पसंतीस पडला.

पण दीपवीरच्या या रॉयल दिसणाऱ्या वेडींग ड्रेसमागे किती मेहनत आहे, याची तुम्हाला कल्पना नसेल. फॅशन डिझाईनर सब्यसाची मुखर्जी (Sabyasachi Mukherjee) यांनी दीपिका-रणवीरचा वेडींग ड्रेस डिझाईन केला होता. पोशाख डिझाईन करतानाचे व्हिडिओज त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तुम्हीही पाहा हे व्हिडिओज...

 

View this post on Instagram

 

The making of Deepika Padukone's wedding lehenga. @deepikapadukone Video Courtesy: Sabyasachi #Sabyasachi #DeepikaPadukone #BridesOfSabyasachi #TheIndiaRevivalProject #TheWorldOfSabyasachi @bridesofsabyasachi

A post shared by Sabyasachi Mukherjee (@sabyasachiofficial) on

 

 

View this post on Instagram

 

The making of Ranveer Singh's wedding sherwani. @ranveersingh Video Courtesy: Sabyasachi #Sabyasachi #RanveerSingh #GroomsOfSabyasachi #TheIndiaRevivalProject #TheWorldOfSabyasachi @groomsofsabyasachi

A post shared by Sabyasachi Mukherjee (@sabyasachiofficial) on

 

लग्नानंतर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचे ग्रँड रिसेप्शन मुंबईत पार पडलं. रिसेप्शनसाठी दीपिकाने अबु जानी आणि संदीप खोसलाच्या लेहेंग्याला पसंती दिली होती. दीपिकासाठी खास सफेद, मोती आणि सोनेरी छटा असलेला लेहेंगा तयार करण्यात आला होता. त्यावर चिकनकारी वर्क करण्यात आले होते तर विविध खडे लावून लेहेंगा अधिक सुशोभित करण्यात आला होता.

हा लेहेंगा कसा साकारला ते पाहा व्हिडिओतून...

 

View this post on Instagram

 

A Mesmerising Journey. Creating a masterpiece for @deepikapadukone 's Mumbai reception Film by @siddharthjain911 . . . #deepikapadukone #deepveer #ranveersingh #reception #themaking #masterpiece #ajsk #abujanisandeepkhosla #abusandeep #gorgeous #stunning #ajskbride #receptionoutfit #chikankari #mumbai

A post shared by Abu Jani Sandeep Khosla (@abujanisandeepkhosla) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

16 हजार कामगारांच्या मदतीने हा लेहेंगा आणि त्यावरील दागिने तयार करण्यात आले आहेत.