नेहा धुपियाकडून घ्या बेबीबम्प लपवण्याचे धडे

एकेकाळी स्वतःच्या बोल्ड आणि ग्लमरस लूकमुळे चर्चेचा विषय ठरलेली नेहा धुपिया, सध्या तिच्या संसारात रमलेली दिसते. मे २०१८मध्ये नेहाने अंगद बेदीशी लग्न केले आणि बघता बघता तिच्या प्रेगनन्सीचीही बातमी आली. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच नेहा बेबी बम्पसोबत दिसली, मात्र या बम्पसोबतच लोकांचे लक्ष वेधून घेतले ते नेहाच्या नवीन ‘प्रेगनन्सी लूक’नेही. बरेचवेळा बेबीबम्प लपवण्यासाठी सेलेब्ज वेगवेगळे आउटफीट वापरताना दिसतात. मात्र नेहाचा हा फॅशन ट्रेंड सध्या लोकप्रिय होताना दिसत आहे.-

नेहा लॅक्मे फॅशन वीक 2018मध्ये पति अंगद बेदीसोबत रॅम्प वॉक करताना दिसली होती. यावेळी डिझायनर पायल सिंघलने नेहासाठी खास बेबीबम्प आउटफीट तयार केला होता. ज्यामध्ये नेहा अगदी आत्मविश्वासाने वावरताना दिसली.

प्रेगनन्सीची बातमी शेअर करण्याआधी नेहाने पतीसोबत सुट्टीचा आनंद घेतानाचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये नेहाने तिचे बेबीबम्प शिताफीने लपवण्याचा प्रयत्न केला आहे. नेहाच्या या ट्रिककडून प्रेरणा घेऊन तुम्ही स्वतःसाठीही हा फंडा वापरू शकता.

ऑगस्ट महिन्यामध्ये नेहाने तिचा प्रिंटेड यलो-व्हाईट देरेस मधील फोटो शेअर केला होता. बेबीबम्प लपवण्यासाठी नेहाने अशा फारच लूज ड्रेसचा वापर केला होता.

अशा प्रकारे सुट्टी व्यतीत करताना नेहाने हँडबॅगचा वापर करून तिचे बेबीबम्प लपवलेले दिसतात.

प्रेग्नन्सीची बातमी देण्याच्या एक दिवस अगोदर नेहा एका मोबाईल कंपनीला प्रमोट करताना दिसून आली. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने याचे काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये अतिशय बोल्ड अंदाजात नेहाने तिचे बेबीबम्प लपवले होते.

करण जोहर सोबतचाही नेहाचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती बेबीबम्प लपवण्यासाठी ब्राऊन कलरच्या जॅकेटचा वापर करताना दिसून आली.

एका चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी नेहाने यलो रंगाचा गाऊन परिधान केला होता. ज्यामध्ये गाऊन घेरामुळे नेहाचे बेबीबम्प झाकून गेले होते.