स्ट्रेच मार्क लपवण्यासाठी Make Up च्या 'या' टीप्स येतील कामी, जाणून घ्या अधिक
त्यामुळे एखादा शॉर्ट कुर्ता किंवा टी-शर्ट घातल्यास शरिरावरील स्ट्रेच मार्क दिसून येतात. असे झाल्यास आपल्याला स्ट्रेच मार्कमुळे अवघडल्यासारखे वाटते.
बहुतांश वेळेस महिलांना प्रेग्नसीनंतर शरिरावर स्ट्रेच मार्क येतात. त्यामुळे एखादा शॉर्ट कुर्ता किंवा टी-शर्ट घातल्यास शरिरावरील स्ट्रेच मार्क दिसून येतात. असे झाल्यास आपल्याला स्ट्रेच मार्कमुळे अवघडल्यासारखे वाटते. यामुळे आपण काही वेळेस स्टायलिश कपडे घालण्याचा विचार करत नाही. स्ट्रेच मार्क हे त्वचेवर ताण पडल्यास निर्माण होतात. यामध्ये घाबरण्याची किंवा लाजण्याची काहीच गरज नाही आहे. पार्टीसाठी तयार होण्यासाठी काही जण हेच स्ट्रेच मार्क लपवण्यासाठी विविध उपाय करतात. तर जाणून घ्या स्ट्रेच मार्क लपवण्यासाठी तुम्हाला मेकअप मधील काही सोप्या टीप्स कामी येतील.
जेव्हा स्ट्रेच मार्क लपवण्याची वेळ आल्यास रंगांची विसंगती काही वेळेस होते. त्यामुळे जर तुमची त्वचा तांबड्या रंगाची असेल तर त्याला हलक्या रंगाच्या मेकअप मधील पिवळ्या रंगाची शेड लावून लपवू शकता. तसेच अंगावरील स्ट्रेच मार्क खुप जुने असल्यास त्याबाबत सुद्धा काळजी घेण्याचे काहीच कारण नाही. अशावेळी तुम्ही तुमच्या स्किन टोन प्रमाणे रंग निवडून स्ट्रेच मार्क लपवू शकता.(Gold Face Treatment Video: जगप्रसिद्ध मॉडेल बेला हदीद हिने केली 24K शुद्ध सोन्याने गोल्ड फेस ट्रीटमेंट; पाहा किती आला खर्च?)
स्ट्रेच मार्क लपवल्यानंतर त्यावरील मेकअप कायम रहावा यासाठी मेअकप ब्रशने त्यावर सेटिंग पावडर लावणे विसरु नका. तसेच मेकअप शिवाय तुम्ही सेल्फ-टॅनरच्या मदतीने सहजतेने लपवू शकता. असे केल्यास तुम्हाला स्ट्रेच मार्क दिसत असल्याचे ही जाणीव होणार नाही आणि तुम्ही मोकळेपणाने पार्टी एन्जॉय करु शकता.