Diwali Fashion Trends 2019: खणाचे क्रॉप टॉप ते पैठणी ड्रेस मुलींनो! यंदा दिवाळी मध्ये ट्राय करा 'हे' हटके ट्रेंडी लुक्स
पारंपरिक पेहराव जपत वावरायला अगदी कंफर्टेबल वाटेल असे काही ट्रेंडी लुक्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुमच्या कपाटात पडलेल्या कपड्यांपासून अगदी कमी बजेट मध्ये तुम्हाला हे लुक्स घरीच बनवता येऊ शकतील..
Diwali 2019 Fashion Trends For Girls: दिव्यांची झगमग आणि रंगेबेरंगी रांगोळीच्या दिवाळी सणात (Diwali 2019) प्रत्येकालाच आपला बेस्ट लूक साकारून मिरवायचे असते. पूर्वी दिवाळ सणाला दागिने घालून भरजरी साड्या नेसून स्त्रिया सोळा शृंगार करायच्या, पण कालानुरूप हे सगळं कॅरी करणे शक्य होत नाही. तरीही नक्की कपडे कसे निवडायचे हा प्रश्न कायम राहतो. पण मुलींनो यंदा काळजी करण्याचं काहीच कारण नाही. पारंपरिक पेहराव जपत वावरायला अगदी कंफर्टेबल वाटेल असे काही ट्रेंडी लुक्स (Trendy Fashion) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुमच्या कपाटात पडलेल्या कपड्यांपासून अगदी कमी बजेट मध्ये तुम्हाला हे लुक्स घरीच बनवता येऊ शकतील..
काय मग वाट कसली बघताय .. उठा आणि तुमच्यातल्या फॅशन डिझायनरला जागे करून बनवा दिवाळी स्पेशल ट्रेंडी लुक.. Diwali 2019 Calendar: धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी ते भाऊबीज पहा यंदा दिवाळी मध्ये कोणता सण कधी?
खणाचा क्रॉप टॉप आणि जीन्स
आपल्या आवडत्या रंगाच्या खणाचे कापड घेऊन तुमच्या पसंतीनुसार त्याचा टॉप शिवून घेऊ शकता. यावर ऑक्सिडाइज्ड किंवा सिल्व्हर दागिने खुलून दिसतील. जर का तुम्ही लाल किंवा हिरवा रंग निवडणार असाल तर मोत्याच्या दागिन्यांचा पर्याय देखील शोभून दिसेल. या टॉप खाली जीन्स किंवा स्कर्ट घालून तुमचा लूक पूर्ण करता येईल.
पैठणीचा ड्रेस
मागील काही दिवसांपासून साड्यांच्या ड्रेसचे फॅड आहे. हा ट्रेंड फॉलो करून तुम्ही पायघोळ किंवा वन पीस च्या रूपातील पैठणीचा ड्रेस विकत घेऊन शकता.या ड्रेसची काठ भरजरी असते त्यामुळे जास्त दागिने घालणे टाळा. तुमच्या आवडीनुसार या ड्रेसची डिझाईन निवडा, पूर्ण हाताचा ड्रेस निवडणार असाल तर लो बॅक ड्रेस आणि स्लीव्ह लेस ड्रेससोबत बोट नेक स्टाईल ही सध्याची पसंती आहे.
चिकन वर्कचे पंजाबी ड्रेस
जर का तुम्हाला ऑफिस साठी कपडे निवडायचे असतील चिकन डिझाईन ही नेहमीच सुरक्षित पर्याय आहे. दिवाळीच्या निमित्ताने ही फॅशन फॉलो करताना लाल, नारंगी, रॉयल ब्लु असे रंग निवडा. ड्रेस निवडताना अलीकडे पेन्सिल कट पायजमा हा उत्तम पर्याय आहे. यावर फक्त झुमके घालून तुमचा लूक पूर्ण करा.
कस्टमाइझड टीशर्ट
जर का तुम्ही "Not So Girly" या प्रकारत येत असाल तर एखदा साधा टीशर्ट आणि त्यावर दिवाळीची प्रतिकात्मक डिझाईन असा पेहराव तुमच्यासाठी सोप्पं पर्याय आहे. दिवाळी निमित्त थोडे मजेशीर कॅप्शन जसे की "दिवे लावतेय", "मी मिरवणार", "झगा-मगा, मला बघा" देऊन तुमच्यातील विनोदकौशल्याचे प्रदर्शन करू शकता.
मिस मॅच फॅशन
कपड्यांमध्ये मिस मॅच फॅशन सध्या कॉलेज पासून ऑफिस पर्यंत,रेग्युलर पासून सणावाराला अगदी सहज वापरली जाते. यानुसार एखाद्या धोती वर डेनिमचा शर्ट घालून किंवा एथनिक टॉप खाली पलाझो घालून तुम्ही हा लूक साकारू शकता.
कपड्यांशिवाय ज्वेलरी मध्ये सुद्धा काही ट्रेंड आहेत, ज्यामध्ये सिलव्हर नोज रिंग, मोठे झुमके आणि ऑक्सिडाईझ्ड चोकर नेकलेस हे हिट आहेत. तर मोत्यामध्ये आर्टफिशल बांगड्या, मांगटिका, छोट्या आकाराची नथ, किंवा नथाच्या पेंडंटचे लॉकेट्स असे पारंपरिक फ्युजन दागिने ट्रेंडिंग आहेत. या लूक सोबत पायात मोजड्या घालायला विसरू नका.